महिलेचा नदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST2021-09-12T04:12:38+5:302021-09-12T04:12:38+5:30

काटाेल : शाैचास गेलेल्या महिलेचा पाय घसरला आणि ती थेट नदीतील पाण्यात पडली. त्यातच तिचा बुडून मृत्यू झाला. ही ...

Woman drowns in river | महिलेचा नदीत बुडून मृत्यू

महिलेचा नदीत बुडून मृत्यू

काटाेल : शाैचास गेलेल्या महिलेचा पाय घसरला आणि ती थेट नदीतील पाण्यात पडली. त्यातच तिचा बुडून मृत्यू झाला. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खानगाव शिवारात गुरुवारी (दि. ९) सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

शेवंताबाई रतन पटपुरिया (७५, रा. रानवाडी, ता. नरखेड) असे मृताचे नाव आहे. त्या त्यांच्या नातेवाईकाकडे खानगाव येथे पाहुण्या म्हणून आल्या हाेत्या. खानगाव परिसरात बुधवारी रात्री मुसळधार पाऊस काेसळल्याने गावालगतच्या नदीला पूर आला हाेता. त्यातच त्या सकाळी नदीच्या काठी शाैचास गेल्या. दरम्यान, पाय घसरल्याने त्या पात्रात गेल्या आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार प्रभूदास दलाल करीत आहेत.

Web Title: Woman drowns in river