महापालिकेच्या कचऱ्याच्या ट्रकने महिलेस चिरडले, जागीच मृत्यू; चालक फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 10:58 IST2023-08-17T10:51:43+5:302023-08-17T10:58:42+5:30

महिलेचा मुलगाही झाला जखमी

Woman crushed by municipal garbage truck, dies on the spot; Truck driver absconding | महापालिकेच्या कचऱ्याच्या ट्रकने महिलेस चिरडले, जागीच मृत्यू; चालक फरार

महापालिकेच्या कचऱ्याच्या ट्रकने महिलेस चिरडले, जागीच मृत्यू; चालक फरार

नागपूर : महानगरपालिकेच्या कचरा नेणाऱ्या ट्रकने चिरडल्यामुळे एका ३८ वर्षांच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रेरणा कॉलनी परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला आहे.

सीमा किशोर चौधरी (वय ३८, रा.रा.सुरेंद्रगड गवळीपुरा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेरणा कॉलनी परिसरातून सीमा चौधरी या आपला मुलगा आदित्यसह दुचाकीवरून जात होत्या. तेवढ्यात त्यांच्या मागून येणाऱ्या महानगरपालिकेच्या कचरा उचलून नेणारा ट्रक क्रमांक एम. एच. ३१, एफ. सी-७१३५ ने त्यांना जोरदार धडक दिली. यात मागे बसलेल्या सीमा यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात त्यांचा मुलगा आदित्यही जखमी झाला. दोघांनाही खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सीमा यांना तपासून मृत घोषित केले. आदित्यवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. गिट्टीखदान पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून, त्याचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Woman crushed by municipal garbage truck, dies on the spot; Truck driver absconding