लग्नाचे आमिष दाखवत अमरावतीच्या नराधमाकडून महिलेवर अत्याचार
By योगेश पांडे | Updated: September 14, 2023 17:33 IST2023-09-14T17:33:08+5:302023-09-14T17:33:49+5:30
यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

लग्नाचे आमिष दाखवत अमरावतीच्या नराधमाकडून महिलेवर अत्याचार
नागपूर : लग्नाचे आमिष दाखवत अमरावती येथील एका आरोपीकडून ३२ वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
अमित गजानन गाठे (२९, बोर्डी, अचलपूर, अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. तो यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहायला होता. २०२१ साली त्याची परिसरातीलच ३२ वर्षीय महिलेशी ओळख झाली. त्याने अगोदर तिच्याशी मैत्री केली व तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले व तिच्यावर वारंवार अत्याचार केले. १४ नोव्हेंबर २०२१ ते १५ जून २०२३ या कालावधीत हा प्रकार सुरू होता.
महिलेने त्याला लग्नासाठी विचारणा केली असता त्याने टाळाटाळ केली. तिने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला असता त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. त्यानंतर आता मी लग्न करत नाही, काय करायचे ते करून घे अशी धमकी दिली. अखेर महिलेने यशोधरानगर पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार केली. पोलिसांनी अमितविरोधात गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध सुरु आहे.