शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 9:16 PM

राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपूरला भरवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि तो अंमलात आणला मात्र डिसेंबरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तसा निर्णय झाला असून तो पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जाहीर केला जाईल.

ठळक मुद्देमनोऱ्याची रुम आणि महिना १ लाख आमदारांना सोडवेनात

अतुल कुलकर्णीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपूरला भरवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि तो अंमलात आणला मात्र डिसेंबरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तसा निर्णय झाला असून तो पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जाहीर केला जाईल.मुंबईत आमदारांच्या निवासस्थानाचे पाडकाम सुरु केले जाणार आहे. शिवाय मुंबईतल्या पावसामुळे अधिवेशनाच्या कामकाजावर परिणाम होतो असे सांगून पावसाळी अधिवेशन विदर्भात घेण्याचा निर्णय झाला. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात नागपूरात अभूतपूर्व पाऊस झाला. त्यामुळे एक दिवस अधिवेशन रद्द ही करावे लागले. मात्र आता हिवाळी अधिवेशन नागपूरात न घेता ते मुंबईत घेतले जाणार आहे. नागपूरातल्या हॉटेल चालकांनाही तुम्ही तुमचे वेगळे बुकींग घ्यायचे असेल तर घ्या, असे संदेशही गेल्याचे सांगण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनात विधिमंडळातल्या अनेक दालनांमध्ये एसी लावण्याची वेळ आली. तर अनेक दालनांमधून मोठे कुलर्स ठेवले गेले, त्याचे पाईप त्याच दालनांच्या बाहेर सोडलेले पहायला मिळाले. काही ठिकाणी तर खिडक्या कापून पाईप बाहेर काढल्याचे चित्र होते.दरम्यान, मुंबईतील मनोरा आमदार निवास पाडण्याचे काम चालू करण्याचा निर्णय घेतला गेला. आमदारांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना दर महिना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचेही ठरले. त्यानुसार आमदारांना पैसे देणेही सुरु झाले. मात्र काही आमदारांनी मनोºयामधील रुमही अजून सोडल्या नाहीत आणि महिना लाख रुपये घेणेही सोडलेले नाही. ही धक्कादायक बाब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या बैठकीत समोर आल्यानंतर हे अधिवेशन संपले की अशा आमदारांवर कारवाई करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्याचे समजते.

 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनMumbaiमुंबई