विधान परिषद सभापतीपदी भाजपाचे राम शिंदे यांची निवड निश्चित; १९ डिसेंबर रोजी निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 07:11 IST2024-12-18T07:09:20+5:302024-12-18T07:11:27+5:30
शिंदेसेनेकडून उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, अखेर शिंदेंचे नाव निश्चित झाले.

विधान परिषद सभापतीपदी भाजपाचे राम शिंदे यांची निवड निश्चित; १९ डिसेंबर रोजी निवडणूक
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मागील २९ महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषद सभापतीपदी भाजपचे प्रा. राम शिंदे यांची निवड निश्चित झाली आहे. राज्यपालांच्या निर्देशांनुसार मंगळवारी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली, त्यानुसार १९ डिसेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. शिंदेसेनेकडून उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, अखेर शिंदेंचे नाव निश्चित झाले.
प्रा. राम शिंदे हे यापूर्वीच्या फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. कर्जत जामखेड मतदारसंघातून ते विधानसभा लढले मात्र त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला. शरद पवार गटाचे रोहित पवार हे तेथे विजयी झाले.
असे आहे परिषदेतील संख्याबळ
भाजप १९, शिंदेसेना ६, अजित पवार गट ७, काँग्रेस ७, उद्धव ठाकरे गट ७, शरद पवार गट ३ अपक्ष ३