भारत टी-२० विश्वचषक जिंकणार की नाही? नागपूरचे प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ नरेंद्र बुंदे यांचे भाकीत काय सांगते
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 20:10 IST2026-03-07T20:09:12+5:302026-03-07T20:10:13+5:30
Nagpur : क्रिकेट आणि क्रिकेटपटूंबद्दल अचूक भविष्य वर्तविणारे बुंदे यांचे अनेक अंदाज आतापर्यंत खरे ठरले. त्यांच्याकडून टिप्स मिळवीत अनेक सेलिब्रिटी क्रिकेटर आणि संघ प्रशासकांनी यश मिळविले आहे.

Will India win the T20 World Cup or not? What does the prediction of Nagpur's famous astrologer Narendra Bunde say?
किशोर बागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०२४ चा विश्वविजेता भारतीय संघ यंदा सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकणार असून, घरच्या मैदानावर, यजमान संघ म्हणून आणि विशेषत: रविवारच्या दिवशी भारत विश्वविजेता बनू शकत नाही, ही सर्व मिथडके तोडून ऐतिहासिक जेतेपद मिळवून तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा मान मिळेल, असे भाकीत नागपूरचे प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ नरेंद्र बुंदे यांनी केले आहे.
क्रिकेट आणि क्रिकेटपटूंबद्दल अचूक भविष्य वर्तविणारे बुंदे यांचे अनेक अंदाज आतापर्यंत खरे ठरले. त्यांच्याकडून टिप्स मिळवीत अनेक सेलिब्रिटी क्रिकेटर आणि संघ प्रशासकांनी यश मिळविले आहे. ‘लोकमत’शी बोलताना आज, रविवारी खेळल्या जाणऱ्या भारत-न्यूझीलंड यांच्यातील फायनलबद्दल त्यांनी मत मांडले. ते म्हणाले, ‘टी-२० विश्वचषक २०२६ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात जिंकण्याचे टीम इंडियाचे योग आहेत. कर्णधार सूर्याच्या कुंडलित गुरू उच्च राशीला आहे तसेच त्याच्या कुंडलीत सूर्य, बुध, शुक्र ही जबरदस्त यश देणारी युती आहे. फायनलच्या दिवशी रविवार आहे व चंद्र तुला राशीला आहे. सूर्याच्या कुंडलीत प्लूटो सोबत भ्रमण करतो आहे. त्यामुळे त्याला नेत्रदीपक कामगिरी करून हा देशाला तिसरा टी-२० विश्वचषक जिंकून देण्याचा जबरदस्त योग आहे.’ बुंदे यांनी भारतीय संघ २००७ आणि २०२४ ला विश्वविजेता बनेल, असे भाकीत वर्तविले होते. दोन्ही वेळा भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकली, हे विशेष.
नरेंद्र बुंदे यांची खरी ठरलेली भाकिते अशी.....
- विराट आणि अनुष्का शर्मा लवकरच विवाहबद्ध होणार, हे भाकीत खरे ठरले.
- विराट कोहली भारताचा नंबर वन ब्रॅंडदूत बनणार! विराट खेळातील सर्वांत मोठा ब्रॅंडदूत ठरला आहे. २०२० ला तो ७१ शतकांवर थांबला होता. त्यानंतर त्याने लागोपाठ शतके ठोकली.
- २०१७ ला केलेल्या भाकितानुसार विराट आपल्या कारकिर्दीत तीन वेळा विश्विजेतेपद पटकाविणार! विराटने स्वत:च्या नेतृत्वात १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला. २०२४ च्या विश्वचषक विजेतेपदात सर्वाधिक योगदान दिले. त्याच्या उपस्थितीत तिसरे जेतेपद लवकरच मिळू शकेल.