शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या टप्प्यात चीनची मेट्रो रेल्वे धावणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:08 IST

आनंद शर्मा नागपूर : भारतीय सीमेवर चीनच्या वाढत्या कुरापतीमुळे भारतीय रेल्वेसह केंद्र सरकारच्या अन्य विभागाने चीनसोबतचे विविध करार रद्द ...

आनंद शर्मा

नागपूर : भारतीय सीमेवर चीनच्या वाढत्या कुरापतीमुळे भारतीय रेल्वेसह केंद्र सरकारच्या अन्य विभागाने चीनसोबतचे विविध करार रद्द केले आहेत. त्यामुळेच नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी चीनमध्ये निर्मित मेट्रो रेल्वेचा उपयोग करणार का? असा प्रश्न लोकांत्या मनात उपस्थित झाला आहे. पुणे मेट्रोकरिता इटलीच्या कंपनीकडून मेट्रो रेल्वे घेता येते, तर भारतीय सीमेवर कुरापती करणाऱ्या चीनच्या मेट्रो रेल्वे कंपनीकडून दुसऱ्या टप्प्यासाठी मेट्रो रेल्वे विकत घेऊ नये, असे लोकांचे मत आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या मेट्रो रेल्वेच्या निर्मितीसाठी चीनच्या सीआरआरसी लोकोमोटिव्ह अ‍ॅण्ड रोलिंग स्टॉक कंपनीसोबत करार केला होता. त्याअंतर्गत सीआरआरसीच्या चीन येथील डालियान प्रकल्पातून नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाकरिता तीन कोचच्या २३ मेट्रो रेल्वेचा पुरवठा करण्यात येणार होता. सध्या १९ रेल्वे नागपुरात आल्या असून त्या ऑरेंज आणि अ‍ॅक्वा लानवर चालविण्यात येत आहेत. उर्वरित चार रेल्वे कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आणि अन्य तांत्रिक कारणांनी नागपुरात आल्या नाहीत.

पूर्वी डोकलाम वादावेळी चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी झाली होती. अशा स्थितीत सीमेवर सुरू असलेल्या वादामुळे नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी चीनकडून मेट्रो रेल्वे खरेदी करण्यात येणार काय, असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित झाला होता.

निविदेनंतर स्थिती स्पष्ट होणार

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मेट्रो रेल्वे खरेदीसाठी निविदा जारी करण्यात येणार आहे. यामध्ये कोणत्याही देशाची कंपनी भाग घेऊ शकते. चीनच्या कंपनीकडून मेट्रो रेल्वे घेण्यात येणार वा नाही, ही स्थिती निविदा प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यातील उर्वरित चार रेल्वे सीआरआरसीच्या चीन येथील डालियान प्रकल्पात तयार आहेत. या रेल्वे दोन वा तीन आठवड्यात नागपूरकडे रवाना होऊ शकतात. दुसऱ्या टप्प्याच्या डीपीआरला दोन महिन्यात मंजुरी मिळाल्यानंतरच बांधकाम सुरू होणार आहे.

- डॉ. बृजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो.