शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

पतीपासून वेगळे राहणे पत्नीला पडले महाग

By admin | Updated: January 6, 2016 03:56 IST

पतीपासून वेगळे राहणे व क्रूरतेने वागणे एका पत्नीला महागात पडले. पत्नीची विभक्तता व क्रूरता या आधारावर कौटुंबिक ...

पतीस घटस्फोट : हायकोर्टात पत्नीचे अपील खारीजनागपूर : पतीपासून वेगळे राहणे व क्रूरतेने वागणे एका पत्नीला महागात पडले. पत्नीची विभक्तता व क्रूरता या आधारावर कौटुंबिक न्यायालयातून पतीला मिळालेला घटस्फोट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला आहे. तसेच, कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध पत्नीने केलेले अपील फेटाळले आहे.न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व झेड. ए. हक यांनी हा निर्वाळा दिला आहे. प्रकरणातील पती-पत्नी संजय व रिचा हे दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. संजय नागपुरात खासगी व्यवसाय करतो तर, रिचा रेवा (मध्य प्रदेश) येथे वैद्यकीय अधिकारी आहे. १६ फेब्रुवारी १९९७ रोजी त्यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर ते काही महिने एकत्र राहिले. रिचाची वागणूक चांगली नव्हती. दरम्यान, ६ फेब्रुवारी १९९९ रोजी तिला रेवा येथे वैद्यकीय अधिकारीपदी नोकरी मिळाली. यानंतर ती मे-१९९९ ते फेब्रुवारी-२००० पर्यंत रेवा येथे राहिली. या काळात ती एकदाही नागपुरात आली नाही. ती नोकरी सोडण्यास तयार नव्हती. यामुळे संजयने आॅक्टोबर-२००१ मध्ये कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. ही याचिका मंजूर झाली. परिणामी रिचाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती पण, प्रकरणातील विविध बाबींमुळे तिला दिलासा मिळाला नाही.(प्रतिनिधी)