शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकांच्या हितासाठी रखडले जुन्या भंडारा रोडचे रुंदीकरण

By admin | Updated: March 13, 2015 02:39 IST

अतिक्रमणधारक रहिवासी व व्यावसायिकांच्या हितासाठी महानगरपालिका जुन्या भंडारा रोडच्या रुंदीकरणास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप संबंधित याचिकाकर्त्यांनी केला आहे.

नागपूर : अतिक्रमणधारक रहिवासी व व्यावसायिकांच्या हितासाठी महानगरपालिका जुन्या भंडारा रोडच्या रुंदीकरणास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप संबंधित याचिकाकर्त्यांनी केला आहे.मेयो रुग्णालय ते गांजाखेत चौक, गांजाखेत चौक ते शहीद चौक व शहीद चौक ते सुनील हॉटेल या जुन्या भंडारा रोडच्या रुंदीकरणासाठी मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रवींद्र पैगवार व मध्य नागपूर विकास आघाडीचे अध्यक्ष भूषण दडवे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणात त्यांनी महापालिकेच्या उत्तरावर प्रत्युत्तर सादर करून प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. नगरविकास विभागाने ७ जानेवारी २००० रोजी मंजूर केलेल्या विकास आराखड्यानुसार जुना भंडारा रोड १८ मीटर रुंद आहे. या रोडवर ९ मीटरपर्यंत अतिक्रमण करण्यात आले आहे. १३ जानेवारी २०१० रोजी महाराष्ट्र नगर रचना कायद्याच्या कलम २६ अनुसार अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आली होती. याविरुद्ध अतिक्रमणधारकांनी उच्च न्यायालयात तीन वेगवेगळ्या रिट याचिका दाखल केल्या होत्या. १९ नोव्हेंबर २०१० रोजी न्यायालयाने तिन्ही याचिका निकाली काढून मनपाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु, यानंतर काहीच झाले नाही. रोडचे रुंदीकरण केल्यास ४०० व्यक्तींना फटका बसेल. तसेच, निधीच्या कमतरतेमुळे रुंदीकरणाची योजना मागे ठेवण्यात आली, असे मनपातर्फे सांगण्यात आले आहे. परंतु, हा मुद्दा प्रतिज्ञापत्रात आलेला नाही. यावरून मनपा जनहिताच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे सिद्ध होते, असे याचिकाकर्त्यांनी नमूद केले आहे. इतवारीतील मारवाडी चौक ते गोळीबार चौकापर्यंतचा रोड कोणाचीही जमीन न घेता रुंद करण्यात आला आहे. केळीबाग रोडच्या रुंदीकरणासाठी मोजमाप झाले आहे. चंद्रशेखर मनपा आयुक्त असताना व्हेरायटी चौक ते मुंजे चौकापर्यंतचा रोड रात्रीत १८ मीटर रुंद करण्यात आला होता. ही कामे करताना एकाही जमीन मालकाला मोबदला देण्याची गरज भासली नाही. असे असताना जुना भंडारा रोडच्या रुंदीकरणासाठी टीडीआर किंवा अतिरिक्त एफएसआय देण्याची मनपाची भूमिका निरर्थक आहे. राज्यघटनेनुसार प्रशासनाने व्यापक जनहिताचा विचार करणे आवश्यक आहे. रस्ते रुंद झाल्यास वाहतूक सुरळीत होईल व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागणार नाही, असे मत याचिकाकर्त्यांनी व्यक्त केले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. पी. के. मिश्रा यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)