शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्याविरुद्ध एफआयआर का नोंदविला नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 21:16 IST

MLA Kirti Kumar Bhangadia, FIR नागपूर सुधार प्रन्यासद्वारे बेघर नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या गृह प्रकल्पांमध्ये खोटी माहिती देऊन सदनिका मिळविण्याच्या प्रकरणात चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १९९, २०० व ४२० अंतर्गत एफआयआर का नोंदविला नाही, अशी विचारणा करणारी नोटीस प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने बुधवारी इमामवाडा व सक्करदरा पोलीस निरीक्षकांना बजावली.

ठळक मुद्देजेएमएफसी न्यायालयाची विचारणा, इमामवाडा व सक्करदरा पोलीस निरीक्षकांना नोटीस

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासद्वारे बेघर नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या गृह प्रकल्पांमध्ये खोटी माहिती देऊन सदनिका मिळविण्याच्या प्रकरणात चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १९९, २०० व ४२० अंतर्गत एफआयआर का नोंदविला नाही, अशी विचारणा करणारी नोटीस प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने बुधवारी इमामवाडा व सक्करदरा पोलीस निरीक्षकांना बजावली. तसेच, यावर दोन दिवसात उत्तर सादर करण्यास सांगितले.

या न्यायालयाने गेल्या २४ डिसेंबर रोजी ॲड. तरुण परमार यांचे सीआरपीसी कलम १५६ (३) व १५५ अंतर्गतचे दोन अर्ज मंजूर करून, इमामवाडा व सक्करदरा पोलीस निरीक्षकांना भांगडिया यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले होते. २८ डिसेंबर रोजी दोन्ही पोलीस निरीक्षकांना या आदेशाची माहिती देण्यात आली. त्यानंतरही त्यांनी एफआयआर नोंदविले नाही. परिणामी, ॲड. परमार यांनी दोन्ही पोलीस निरीक्षकांवर अवमानना कारवाई करण्यासाठी नवीन अर्ज दाखल केला आहे. त्यात न्यायालयाने दोन्ही पोलीस निरीक्षकांना नोटीस बजावली.

कीर्तीकुमार भांगडिया यांच्या पत्नी सोनल यांनी उंटखानामधील दहीपुरा येथील नासुप्र लोकगृह निर्माण योजनेतील टू-बीएचके सदनिका (इमारत-एबी, गाळा क्र. ३०१) मिळविली आहे. त्यांच्याकडे २४ सप्टेंबर २००७ पासून त्या सदनिकेचा ताबा आहे. त्यानंतर कीर्तीकुमार भांगडिया यांनी या योजनेतील दुसरी टू-बीएचके सदनिका (इमारत-एबी, गाळा क्र. ३०३) आणि सक्करदरामधील आयुर्वेदिक ले-आऊट येथील नासुप्र गृह योजनेतील थ्री-बीएचके सदनिका (इमारत-डी, गाळा क्र. २०२) मिळविली. त्यांच्याकडे दहीपुरा येथील सदनिकेचा २५ जून २००८ पासून तर, आयुर्वेदिक ले-आऊट येथील सदनिकेचा ९ एप्रिल २००९ पासून ताबा आहे. या दोन्ही सदनिका मिळविताना त्यांनी स्वत:सह पत्नी व मुलांच्या नावाने नागपूर महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास हद्दीमध्ये घर, गाळे किंवा भूखंड नसल्याची खोटी माहिती लिहून दिली, असे अर्जदार परमार यांचे म्हणणे आहे. अर्जदारातर्फे ॲड. सतीश उके व ॲड. वैभव जगताप यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयMLAआमदारnagpurनागपूर