शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनातही उद्घाटनाचा अट्टाहास कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दोन हजाराच्या जवळपास जात आहे. संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी शनिवार-रविवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दोन हजाराच्या जवळपास जात आहे. संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी शनिवार-रविवारी शहरातील बाजारपेठा, आठवडी बाजार व दुकाने बंद ठेवली जात आहेत. १५ ते २१ मार्चदरम्यान लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊन कालावधीत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. दुसरीकडे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी धार्मिक कार्यक्रम, उद्घाटन व भूमिपूजनांचा सपाटा लावला आहे. कोरोना संक्रमणाचा धोका वाढला असताना हा अट्टाहास कशासाठी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यात मागील दोन वर्षांपासून विकासकामे ठप्प असल्याने नगरसेवक व पदाधिकारी अस्वस्थ आहेत. प्रभागातील नागरिकांची नाराजी दूर करण्यासाठी आम्ही अ‍ॅक्टिव्ह आहोत, असे भासविण्यासाठी त्यांनी धार्मिक कार्यक्रम, उद्घाटन व भूमिपूजनांचा सपाटा लावला आहे. यातून कोरोना संक्रमण होईल, याचे भान राहिलेले नाही. नागरिकांना कोरोना संक्रमण टाळण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणारे पदाधिकारी स्वत: मात्र नियमांचे पालन करीत नाहीत. मग आम्हालाच प्रतिबंध कशासाठी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

कोरोनामुळे लग्नसमारंभाला मंगल कार्यालयात मोजक्या लोकांच्या उपस्थितीतही परवानगी नाही. घरगुती समारंभ करा, असा सल्ला प्रशासनाकडून दिला जाते. दुसरीकडे महाशिवरात्रीला महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत नारी घाटावर भगवान शंकराची मूर्ती स्थापित करण्यात आली. यावेळी नगरसेवक मनोज सांगोळे, दिनेश यादव, भावना लोणारे, माजी नगरसेविका सविता मनोज सांगोळे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

...

क्रिकेट अकॅडमीचे उद्घाटन

धंतोली झोन क्षेत्रातील कुकडे ले-आऊट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने यांच्या हस्ते आर. एल. एलेवन क्रिकेट अकॅडमीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी धंतोली झोनच्या सभापती वंदना भगत, अकॅडमीचे प्रमुख ऋषी लोधी, झोनच्या सहायक आयुक्त किरण बगडे, वंदना हिरेखन यांच्यासह २५ ते ३० खेळाडू उपस्थित होते. विशेष म्हणजे कार्यक्रमाप्रसंगी काही जणांच्या तोंडाला मास्क नव्हते. असेच धार्मिक कार्यक्रम, पक्षाच्या बैठका सुरू आहेत. यातून संक्रमणाचा धोका नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

.........