शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

इंदूरला जमले नागपूरला का नाही?

By admin | Updated: May 6, 2017 02:59 IST

२०११-१२ मध्ये इंदूर ६१ व्या क्रमांकावर होते तर २०१४ मध्ये १४९ व्या क्रमांकावर घसरले होते.

नागपूरचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. नागपूरचे नितीन गडकरी केंद्रात हेवीवेट मंत्री. नागपुरात भाजपचे अजय संचेती आणि डॉ. विकास महात्मे हे दोन राज्यसभा सदस्य. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क अशा दोन खात्यांचा कार्यभार. नागपुरात सहाही आमदार भाजपचेच. महापालिकेत १० वर्षांपासून सत्ता याच पक्षाची. असे भाजपसाठी सर्वत्र अनुकूल आणि सुजलाम सुफलाम् वातावरण असतानाही उपराजधानीचे हे शहर स्वच्छतेच्या बाबतीत देशात तब्बल १३७व्या क्रमांकावर माघारणे ही साऱ्यांसाठीच लाजिरवाणी बाब ठरली आहे. भाजपासाठी ही जशी शोकांतिका आहे तसेच हे नागपुरातील नागरिकांचे अपयशही आहे. मध्यप्रदेशातील इंदूर हे शहर देशातील सर्वोच्च स्वच्छ शहर म्हणून बहुमान पटकावू शकते. इंदूरला जे जमले ते गडकरी, फडणवीसांच्या नागपूरला का नाही, असा प्रश्न यानिमित्ताने कुणी विचारला तर स्वाभाविकच ठरविला गेला पाहिजे. इंदूरच्या महापौर मालिनी गौड यांनी उलगडले यशाचे रहस्य : महापालिका बोध घेणार का ? कमलेश वानखेडे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : २०११-१२ मध्ये इंदूर ६१ व्या क्रमांकावर होते तर २०१४ मध्ये १४९ व्या क्रमांकावर घसरले होते. त्यामुळे या शहराला स्वच्छतेचा किताब मिळवून देणे तेवढे सोपे नव्हते. मात्र, तेथील महापौर मालिनी गौड, आयुक्त, नगरसेवक, अधिकारी, सफाई कर्मचारी व नागरिक यांनी आपापले कर्तव्य बजावले. स्वच्छतेला प्राधान्य दिले व इंदूरच्या शिरपेचात देशातील सर्वात स्वच्छ शहर होण्याचा मानाचा तुरा रोवला गेला. या यशाबाबत ‘लोकमत’ने इंदूरच्या महापौर मालिनी लक्ष्मणसिंह गौड यांच्याशी संपर्क साधला. गौड यांनी स्वच्छतेचा ’इंदूर पॅटर्न’ मांडत मनात आणले तर शहर स्वच्छ करणे कठीण नाही, असे इतर शहरांसाठी प्रेरणादायी ठरणारे मत व्यक्त केले. महापौर गौड म्हणाल्या, पूर्वी इंदूर शहरात दररोज ६०० ते ७०० टन कचरा उचलला जायचा. असे असले तरी सुमारे २०० टन कचरा रस्ते व कचऱ्या पेट्यांमध्ये पडून रहायचा. कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आलेली कंपनी ‘ए टू झेड’ चे काम समाधानकारक नसल्यामुळे सर्वप्रथम या कंपनीला हटविण्यात आले. महापालिकेने स्वत:ची यंत्रणा उभी केली. सुमारे १५०० अधिकारी- कर्मचाऱ्यांची नवी टीम तयार करण्यात आली. आमच्या शहराची सफाई आम्हालाच करू द्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत मिळालेल्या निधीतून कचरा उचलण्यासाठी ८५ गाड्या खरेदी केल्या. जुन्या डंपर गाड्यांची दुरुस्ती केली. घराघरातून कचरा उचलण्यास सुरुवात केली. विशेष स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यासाठी महापौर, आयुक्त, नगरसेवक यांची एक यंत्रणा उभारण्यात आली. यापैकी कुणालाही कुठे कचरा पडलेला आढळला तर त्यांनी महापालिका प्रशासनाला थेट वायरलेसवर माहिती कळवावी, अशी सोय करून देण्यात आली. यात नगरसेवकांनी चांगला पुढाकार घेतला. कचरा दिसताच तक्रारी होऊ लागल्या. आयुक्त मनीष सिंग यांचे परिश्रम व सहकार्य या कामी महत्त्वाचे राहिले. आपण स्वत:ही महापौर म्हणून बऱ्याचदा सकाळी शहराचा पाहणी दौरा केला. त्यामुळे प्रशासनालाही अलर्ट रहावे लागले. शेवटी सर्वांच्या सहकार्यातून शहर स्वच्छ झाले. रस्त्यांची धुलाई सुरू केली शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ, माती जमा व्हायची. सफाई केल्यानंतरही माती निघत नव्हती. त्यामुळे प्रमुख रस्त्यांची वेगवेगळ्या मशीन वापरून सफाई सुरू करण्यात आली. काही रस्ते रात्री धुण्यास सुरुवात केली. त्यामुळे रस्ते चकाचक दिसू लागले. होळकर यांच्या काळानंतर पहिल्यांदाच इंदूरमध्ये रस्ते धुण्याचा उपक्रम राबविण्यात आला. स्वच्छ केलेल्या रस्त्यांवर पुन्हा कुणी कचरा फेकू नये म्हणून पथकाद्वारे पाळत ठेवण्यात आली. कारवाईमुळे कर्मचारी लागले सफाईला इंदूर महापालिकेत सुमारे सहा हजार सफाई कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांवर दररोजच्या सफाईची जबाबदारी होती. मात्र यापैकी सुमारे साडेचार हजार कर्मचारी प्रत्यक्षात सफाईचे कामच करीत नव्हते. आरोग्य निरीक्षक किंवा तत्सम अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून फक्त पगार घेत होते. महापालिका प्रशासनाने कडक कारवाई करीत ५०० सफाई कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले. यामुळे इतर कर्मचारी वठणीवर आले. नियमित सफाई करू लागले. जगजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घराघरातून कचरा उलण्यास सुरुवात केल्यानंतर या मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळणे आवश्यक होते. त्यामुळे जनजागृतीसाठी ४०० स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व सामाजिक संघटनांची मदत घेण्यात आली. याशिवाय स्वच्छतेचे महत्त्व, फायदे पटवून देणारे होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर शहरात लावण्यात आले. चित्रपटगृहांमध्ये याची जाहिरात करण्यात आली. सोशल मीडियाचीही मदत घेण्यात आली. कचरा गाड्यांवर सुरेल गाणी घरोघरी कचरा उचलण्यासाठी जाणाऱ्या गाड्यांवर लाऊड स्पीकर लावण्यात आले. त्यावर दररोज ‘स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने’ हे महापालिकेने तयार करून घेतलेले गाणे लावले जायचे. शहरात स्वच्छता अभियान राबविले जात असून सुजाण नागरिक म्हणून स्वच्छता राखणे ही आपलीही जबाबदारी आहे, याची जाणीव नागरिकांना करून देण्यात आली. या सकारात्मक परिणाम दिसून आला. नागरिकांनी