शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

विशेष परीक्षेचा भुर्दंड कोण भरणार?

By admin | Updated: August 14, 2014 01:21 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रवेशबंदी लावलेली असतानादेखील ६३ महाविद्यालयांनी ६,६१६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. संबंधित विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये याकरिता विशेष परीक्षेला

नागपूर विद्यापीठ : दोषी महाविद्यालयांबाबत प्रशासनाचे मौननागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रवेशबंदी लावलेली असतानादेखील ६३ महाविद्यालयांनी ६,६१६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. संबंधित विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये याकरिता विशेष परीक्षेला मान्यता देण्यात आली अन् त्याची तयारी सुरू झाली. परंतु संबंधित परीक्षेसाठी होणारा खर्च हा विद्यापीठाच्या तिजोरीतून होणार आहे. महाविद्यालयांच्या चुकीमुळे संबंधित परीक्षा घेण्याची वेळ आली असताना त्यांच्याकडूनच याचा खर्च वसूल करण्यात यावा, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू झाली आहे. संबंधित मुद्यावर विद्यापीठाने मौन साधले आहे.राज्यपाल कार्यालयाने मंजुरी दिल्यामुळे २८ आॅगस्टपासून विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे. यासंबंधीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परंतु विद्यापीठाला सर्व जिल्ह्यांत ही परीक्षा घ्यावी लागणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांचा खर्च, वाहतूक खर्च, मनुष्यबळ याचे नियोजन करावे लागणार आहे. याशिवाय कला, विज्ञान व वाणिज्य शाखा मिळून निरनिराळ्या अभ्यासक्रमांच्या यात परीक्षा घेतल्या जाणार आहे. त्यांच्यासाठी परीक्षा ‘मॉडरेशन’ पासून ते उत्तरपत्रिका, मूल्यांकन, निकाल जाहीर करणे इत्यादी प्रकारची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. याशिवाय, परीक्षा विभागावर अगोदरच उन्हाळी परीक्षांच्या निकालाचे ओझे आहे. अनेक कर्मचाऱ्यांना जास्त वेळ थांबून काम करावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांचा मोबदला इत्यादींसाठी विद्यापीठाच्याच तिजोरीतून पैसे खर्च होणार आहेत. संबंधित परीक्षा ही प्रवेशबंदी घातलेल्या महाविद्यालयांनी नियमबाह्य पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यामुळे उद्भवली आहे. अशा स्थितीत या महाविद्यालयांकडूनच विद्यापीठाने परीक्षेचा खर्च का वसूल करू नये, असा प्रश्न नाव न घेण्याच्या अटीवर काही अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यातील अनेक महाविद्यालयांनी संबंधित विद्यार्थ्यांचा नामांकन नोंदणी क्रमांक नसतानादेखील त्यांच्या नावावर समाजकल्याण व आदिवासी विभागाकडून शिष्यवृत्ती उचलली असल्याची तक्रार समाजकल्याण विभागाला प्राप्त झाली आहे.(प्रतिनिधी)