लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) अतिरिक्त महासंचालक विजय साखरे यांच्याकडे दिल्ली स्फोटाच्या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. साखरे केरळ केडरचे आयपीएस असून, त्यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्यांचे पथक नेमण्यात आले आहे.
गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) या स्फोटाचा तपास देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर एनआयचे महासंचालक सदानंद दाते यांनी तपासाची जबाबदारी साखरे यांच्याकडे सोपविली. त्यांच्यासोबत दहा सदस्यां पथक असेल. यात एक महानिरीक्षक, दोन उपमहानिरीक्षक, तीन पोलिस अधीक्षक आणि उर्वरित उप अधीक्षकांचा समावेश आहे.
दिल्लीतील स्फोटप्रकरणी तपास करणाऱ्या एनआयए पथकाचे नेतृत्व नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे करत आहेत. देशातील 'टॉप-१० आयपीएस' अधिकाऱ्यांमध्ये गणले जाणारे साखरे हे धाडसी, कुशाग्र आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे नागपूरनेच राष्ट्रीय तपास यंत्रणेला 'राष्ट्र रक्षणम्, आद्य कर्तव्यम्' हे ब्रीद दिले असून, आता पुन्हा एक नागपूरकर अधिकारी मानाची जबाबदारी सांभाळणार आहे.
विजय साखरे यांनी व्हीएनआयटी नागपूर, आयआयटी दिल्ली आणि हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९९६ मध्ये आयपीएसमध्ये प्रवेश केला. केरळ कॅडरमधील विविध पदांवर काम करताना त्यांनी कोचीतील अनेक क्लिष्ट प्रकरणे उकलली. तीन वर्षापूर्वी त्यांची 'एनआयए'त आयजी म्हणून नियुक्ती झाली होती. सप्टेंबर २०२५ मध्ये ते अतिरिक्त महासंचालक (एडीजी) झाले. आता दिल्ली स्फोटाच्या तपासाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली आहे.
Web Summary : IPS Vijay Sakhare, from Nagpur, heads the NIA team investigating the Delhi blast. Known for his sharp intellect and integrity, he has a distinguished career, including education at VNIT Nagpur, IIT Delhi, and Harvard. He currently serves as Additional Director General of NIA.
Web Summary : नागपुर के आईपीएस विजय साखरे दिल्ली विस्फोट की जांच कर रही एनआईए टीम का नेतृत्व कर रहे हैं। अपनी कुशाग्र बुद्धि और ईमानदारी के लिए जाने जाने वाले, उनके पास वीएनआईटी नागपुर, आईआईटी दिल्ली और हार्वर्ड में शिक्षा सहित एक विशिष्ट करियर है। वे वर्तमान में एनआईए के अतिरिक्त महानिदेशक के रूप में कार्यरत हैं।