शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कौन है, कौन है...वो डॉन है!

By admin | Updated: May 6, 2015 02:14 IST

डॉन बाहेर येताच साडेपाच-पावणेसहा फूट उंचीच्या १० ते १५ तरुणांनी ‘त्यांच्या’भोवती सुरक्षा कडे केले. गर्दी वाढतच होती. अवघे २५ फूट अंतर चालेपर्यंत रेटारेटी झाली.

नागपूर : डॉन बाहेर येताच साडेपाच-पावणेसहा फूट उंचीच्या १० ते १५ तरुणांनी ‘त्यांच्या’भोवती सुरक्षा कडे केले. गर्दी वाढतच होती. अवघे २५ फूट अंतर चालेपर्यंत रेटारेटी झाली. गळ्यात सोनसाखळ्या अन् हातात जाडजूड कडे, ब्रेसलेट घातलेल्यांनी ‘त्यांना’ ब्लॅक इन्डेव्हर(एमएच ४३/ ए ६९९९)मध्ये बसवले. या आलिशान कारच्या मागे आणि पुढे १० ते १५ कारचा ताफा सुसाट वेगाने रामनगरकडे निघाला. या गर्दीत पाच-दहा लोक बाहेरचेही होते. कौन है, कौन है, अशी त्यांनी विचारणा केली. अनेकांनी एकसाथ उत्तर दिले... वो डॉन है!तडका बहोत पसंद है !डॉनचा काफिला सुसाट वेगाने रामनगरमधील हरीश हिरणवार यांच्या घरी पोहचला. हिरणवार कुटुंबीय गवळी यांच्या नात्यात लागतात. सोबतच अरुण गवळींची सूनसुद्धा हिरणवार यांची भाची आहे. अर्थात् वर आणि वधू पक्षाकडूनही नातेसंबंध असल्यामुळे हिरणवार कुटुंबीयांकडे गवळीचा ताफा दुपारी २ वाजता तिथे पोहचला. अनेक दिवसांपासून घरच्या जेवणापासून दूर असलेल्या अरुण गवळी व अन्य नातेवाईकांपुढे हिरणवार परिवाराने विविध पदार्थ वाढले. गवळीने ‘दाल तडका अन् रोटी’ वर ताव मारला. (त्यांना म्हणे दाल तडका फारच आवडतो) दुपारी ४.३०पर्यंत अनेकांशी भेटीगाठी अन् फोटोसेशन झाल्यानंतर गवळी रामदासपेठेतील हॉटेलमध्ये आला. सायंकाळचे विमान असल्यामुळे ६.३० च्या सुमारास विमानतळावर डॉनचा काफिला पोहचला. पुन्हा कुजबुज सुरू करत डॉन मुंबईकडे रवाना झाला. (प्रतिनिधी)डॅडीच्या ‘मूड’ वर डॉनच्या स्वभावाशी पुरते परिचित असलेल्या या साथीदारांनी मुंबईला जाण्यासाठी हवाई आणि बाय रोड अशी दुहेरी व्यवस्था करून ठेवली होती. रखरखते ऊन लक्षात घेता रामदासपेठेतील एका आलिशान हॉटेलचा सूटही बूक करून ठेवला होता. बाहेर आल्यानंतर त्याचा मूड कसा असेल, हे आम्हाला सांगता येणार नाही. त्यामुळे डॅडींसाठी त्याच्या आवडीच्या इन्डेव्हरसह ५ गाड्या अन् आमच्यासाठी आणखी ८ ते १० गाड्या आहेत, असे त्यांचा एक साथीदार लोकमतशी बोलताना सांगत होता. एकदाचे ‘त्यांचे’ डॅडी बाहेर आले अन् ब्लॅक इन्डेव्हरमध्ये बसले. वाहनचालकांनी सिग्नल तोडले? अरुण गवळीच्या सोबत असलेल्या काही वाहनचालकांनी रामनगरकडे जाताना अनेक सिग्नल तोडल्याची चर्चा आहे. ‘रेड लाईट‘ असूनही त्याला न जुमानता अनेक वाहनचालकांनी सिग्नल तोडले. अलंकार परिसरात काही पोलिसांनी यावेळी नुसती बघ्याची भूमिका बजावल्याची चर्चा आहे. या संदर्भात पोलिसांकडे विचारणा केली असता कुणाकडेही याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले.