शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१०१ व्या दीक्षांत समारंभाला अतिथी कोण?

By admin | Updated: January 9, 2015 00:45 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०१ वा दीक्षांत समारंभ २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभात नेमके कोणाला मुख्य अतिथी म्हणून बोलवायचे

नागपूर विद्यापीठ : सी.एन.आर.राव, कैलाश सत्यार्थींना बोलविण्याचा मानसनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०१ वा दीक्षांत समारंभ २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभात नेमके कोणाला मुख्य अतिथी म्हणून बोलवायचे यासंदर्भात गुरुवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. सुप्रसिद्ध वैज्ञानिक व भारतरत्न पुरस्कारप्राप्त सी.एन.आर.राव किंवा नोबेल शांती पुरस्कार विजेते समाजसेवक कैलाश सत्यार्थी यांच्या नावांवर एकमत झाले. या दोघांना या सोहळ््यासाठी आमंत्रित करण्याचे प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली.नागपूर विद्यापीठाचा शंभरावा दीक्षांत समारंभ यशस्वीपणे पार पडला. परंतु हा समारंभ सुमारे वर्षभर लांबल्यामुळे १०१ व्या दीक्षांत समारंभासाठी मुहूर्त कधी निघणार यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. अखेर २० फेब्रुवारी रोजी हा दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचे निश्चित झाले व राज्यपाल कार्यालयाकडूनदेखील या तारखेला आयोजन करण्यास मंजुरी देण्यात आली. गुरुवारी झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मुख्य अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित करायचे यासंदर्भात चर्चा झाली. या समारंभाला राजकारणी नव्हे तर शैक्षणिक व्यक्तीच मुख्य अतिथी म्हणून बोलविण्यात यावे असा सदस्यांचा सूर दिसून आला. यावेळी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील निरनिराळ््या व्यक्तींची नावे सदस्यांकडून सुचविण्यात आली. यात भारतरत्न सी.एन.आर.राव तसेच कैलाश सत्यार्थी यांच्या नावांवर भर देण्यात आला. या दोघाही मान्यवरांना संपर्क करून निमंत्रण देण्यात येईल अशी माहिती विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान या समारंभाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांची उपस्थिती असावी यासाठी विनंती करण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)