शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वाघांचा वनवास कधी संपणार?

By admin | Updated: July 8, 2014 01:20 IST

गत पाच वर्षांपासून वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद भोगत असलेल्या ‘त्या’ वाघांच्या सुटकेची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र केवळ ‘रेडिओ कॉलर’च्या प्रतीक्षेत ‘त्या’ वाघांना पिंजऱ्यात कैद भोगावी लागत आहे.

पेंचच्या एन्क्लोजरमध्ये कै द : वन विभाग ‘रेडिओ कॉलर’च्या प्रतीक्षेत नागपूर : गत पाच वर्षांपासून वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद भोगत असलेल्या ‘त्या’ वाघांच्या सुटकेची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र केवळ ‘रेडिओ कॉलर’च्या प्रतीक्षेत ‘त्या’ वाघांना पिंजऱ्यात कैद भोगावी लागत आहे. दुसरीकडे शेवटी या निरपराध वाघांचा वनवास कधी संपणार? असा वन्यजीवप्रेमी प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. विशेष म्हणजे, या एन्क्लोजरमधील तिन्ही वाघांची फारच रोमांचक हकीकत आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी तिन्ही बछडे आपल्या आईपासून जंगलात भटकले होते. यानंतर वन अधिकाऱ्यांनी या बछड्यांना आपल्या ताब्यात घेऊन सुरुवातीला त्यांना बोर अभयारण्यातील पिंजऱ्यात ठेवण्यात आले. येथे त्यांनी सुमारे तीन वर्षे कैद भोगली. यानंतर त्यांना पेंचमधील एन्क्लोजरमध्ये स्थलांतरित करण्यात आले. येथे ते गत दोन वर्षांपासून राहात असून, आता ते सुमारे पाच वर्षांचे झाले आहेत. माहिती सूत्रानुसार, गत काही दिवसांपूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. एस. रेड्डी यांनी पुढाकार घेऊन त्यांना जंगलात सोडण्यासंबंधी हालचाली सुरू केल्या. तिघांपैकी दोन वाघिणींना रेडिओ कॉलर लावून पेंचच्या जंगलात सोडण्याचा निर्णयही घेण्यात आला; शिवाय ‘रेडिओ कॉलर’चा आॅर्डरही देण्यात आला. मात्र गत सहा महिन्यांपासून रेडिओ कॉलर वन विभागापर्यंत पोहोचलेली नाही. यासंबंधी मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. एस. रेड्डी यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी केवळ रेडिओ कॉलरसाठी विलंब होत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, रेडिओ कॉलर विदेशातून मागणी करावी लागत असून, त्यासाठी वन विभागाने संबंधित संस्थेला आॅर्डर दिली आहे. त्यानुसार रेडिओ कॉलर पोहोचताच, वाघांची सुटका केली जाईल. (प्रतिनिधी)