लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वे स्टेशन ते इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया(मेयो)पर्यंत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या रामझुला पार्ट- २ उड्डाणपूल वाहतुकीसाठी तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी तृतीयपंथी समाज संघटनेतर्फे सोमवारी निदर्शने करण्यात आली. यासोबतच स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याच्या घोषणाही देण्यात आल्या.रामझुल्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण व्हायला नागरिकांना १८ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. तो कसाबसा पूर्ण झाला. आता रामझुल्याच्या दुसऱ्या भागाचेही काम पूर्ण झाले आहे. एकाच पुलावरून वाहतूक सुरू असल्याने येथे वाहतूक जामची समस्या असते. तेव्हा हा पूल वाहतुकीसाठी तातडीने सुरू करण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकर्ते तृतीयपंथीयांनी केली. यासंदर्भात विदर्भ स्वराज्य आंदोलन समिती आणि किन्नर सर्व समाज विकास संस्थेतर्फे प्रशासनाला निवेदनही सादर करण्यात आले, परंतु नागरिकांच्या या समस्येबाबत प्रशासनाने कुठलेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे सोमवारी दुपारी समितीचे संयोजक उत्तमबाबा सेनापती यांच्या नेतृत्वात तृतीयपंथी रामझुला पार्ट २ वर पोहोचले आणि त्यावरून वाहतूक सुरू करण्याची घोषणा केली. पोलिसही घटनास्थळी पोहोचले.
नागपुरातील रामझुला पार्ट-२ कधी सुरू करणार? तृतीयपंथीयांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 22:38 IST
नागपूर रेल्वे स्टेशन ते इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया(मेयो)पर्यंत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या रामझुला पार्ट- २ उड्डाणपूल वाहतुकीसाठी तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी तृतीयपंथी समाज संघटनेतर्फे सोमवारी निदर्शने करण्यात आली. यासोबतच स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याच्या घोषणाही देण्यात आल्या.
नागपुरातील रामझुला पार्ट-२ कधी सुरू करणार? तृतीयपंथीयांचे आंदोलन
ठळक मुद्दे एकतर्फी रस्त्याने ट्रॅफिक जामची समस्या, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले