शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘मिस्ट कुलिंग सिस्टीम’ कधी?

By admin | Updated: February 18, 2015 02:48 IST

उन्हाळ्यात रेल्वेगाडीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची लाहीलाही होते. रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्मवर त्यांच्यासाठी कुठलीच सुविधा उपलब्ध करून दिली नाही.

दयानंद पाईकराव नागपूरउन्हाळ्यात रेल्वेगाडीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची लाहीलाही होते. रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्मवर त्यांच्यासाठी कुठलीच सुविधा उपलब्ध करून दिली नाही. गोंदिया रेल्वेस्थानकावर उन्हाळ्यात थंड हवा आणि पाण्याचा हलका फवारा मिळावा यासाठी ‘मिस्ट कुलिंग सिस्टीम’ बसविण्यात आली. परंतु नागपुरात ही सुविधाच नसल्यामुळे गोंदियाने उपराजधानीला पिछाडीवर टाकल्याचे धक्कादायक वास्तव आहे. उपराजधानीत उन्हाळ्यात पारा ४८ पर्यंत जातो. रेल्वे प्रवाशांच्या जीवाची लाहीलाही होते. अशा परिस्थितीत रेल्वेगाडीची वाट पाहत प्लॅटफार्मवर बसण्याची कसरत त्यांना करावी लागते. प्लॅटफार्मवर सर्वच ठिकाणी पंख्यांची सुविधा नाही. पंखे असूनही त्यातून गरम हवा मिळत असल्यामुळे प्रवाशांची आणखीनच गैरसोय होते. प्रवाशांना या त्रासापासून वाचविण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने काही दिवसांपूर्वी गोंदिया रेल्वेस्थानकावर ‘मिस्ट कुलिंग सिस्टीम’चा शुभारंभ केला. या यंत्रणेत प्लॅटफार्मवर बसलेल्या प्रवाशांना उन्हाळ्यात थंड हवा आणि पाण्याचा हलकासा फवारा त्यांच्या अंगावर पडतो. त्यामुळे प्लॅटफार्मवरील तापमानात घट होऊन प्रवाशांना कडक उन्हापासून संरक्षण मिळते. उपराजधानीच्या रेल्वेस्थानकाला वर्ल्ड क्लास रेल्वेस्थानक करण्याची घोषणा करण्यात आली. परंतु प्रवाशांना ही सुविधा गोंदियात मिळत असेल आणि नागपुरात मिळत नसेल तर ही नक्कीच दुर्दैवाची बाब आहे. ही सिस्टीम बसविण्यासाठी प्रत्येक प्लॅटफार्मवर २५ लाखाचा खर्च अपेक्षित आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर आठ प्लॅटफार्म असून येथे ही सिस्टीम बसविण्यासाठी २ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. परंतु १८०० कोटींचे उत्पन्न दरवर्षी मिळवून देणाऱ्या मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला मागील वर्षभरापासून ही सिस्टीम बसविता आली नाही. ही सिस्टीम बसविण्याचा निर्णय नागपूर पातळीवर घ्यावयाचा असूनही त्याबाबत काहीच निर्णय न झाल्यामुळे आणखी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.