शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

By admin | Updated: November 18, 2016 03:06 IST

देशातील मोठ्या उद्योगपतींना कर्जमाफी देणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियावर तोंडसुख घेतले जात आहे.

वातावरण तापले : धनदांडग्यांच्या कर्जमाफीनंतर टीकास्त्रउमरेड : देशातील मोठ्या उद्योगपतींना कर्जमाफी देणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियावर तोंडसुख घेतले जात आहे. सोबतच सरकारवरही ग्रामीण भागातून टीकास्त्र सोडले जात असून शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार, याबाबतचा निर्णय कधी घेणार, असा सवाल आता यानिमित्ताने विचारला जात आहे. सरकार आणि बँका केवळ धनाढ्यांचाच विचार करीत असेल तर हे योग्य नाही. बँक आणि सरकारने उद्योगपतींच्या या निर्णयावर फेरविचार करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.उद्योगपतींच्या कर्जमाफी निर्णयावर प्रतिक्रिया घेतल्या असता, उमरेड पालिकेचे उपाध्यक्ष गंगाधर रेवतकर म्हणाले, शेतकरी - शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी यांना एकीकडे रांगेत लावायचे आणि दुसरीकडे उद्योगपतींना कर्जमाफी द्यायची. सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी करणारे हे सरकार आहे. नोटा रद्द करण्याचा निर्णय योग्य असला तरी नियोजनशून्य परिस्थितीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णत: ढासळली आहे, असेही ते म्हणाले. युवा नेते राजू पारवे म्हणाले, मोलमजुरी बुडवून बँकेत हजार - दोन हजार मिळतील या आशेने अनेकांचा दिवस वाया जात आहे. त्यातही पैसे मिळतील की नाही याचा नेमही राहिला नाही. एकीकडे असंख्य शेतकऱ्यांची खाती असलेल्या जिल्हा बँकेलाही पाचशे, हजाराच्या नोटा स्वीकारण्यासाठी मनाई केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. उमरेड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर खानोरकर यांनीही कर्जमाफीच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. याऐवजी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असते तर भविष्यातील आत्महत्या तरी थांबल्या असत्या. रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या शेतकरी - शेतमजुरांचे हे सरकार राहिले नाही तर ‘एसी वाल्या’ धनदांडग्यांचे झालेले आहे, असाही घणाघात त्यांनी केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विलास झोडापे यांनीही हा अतिशय चुकीचा निर्णय असून तीव्र शब्दात निषेध नोंदविला. शेतकरी - शेतमजुरांनी कोणत्याही अपेक्षा ठेवू नये. भांडवलदारांचेच शासन आहे. आज ना उद्या हा निर्णय होणारच होता; तो झाला. सरकार प्रत्येक निर्णयाला देशभक्तीसोबत जोडून तरुणांची डोकी भडकविण्याचे काम करीत असल्याचाही आरोप झोडापे यांनी केला. (तालुका प्रतिनिधी)