लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेच्या एका कनिष्ठ प्रशासन महिला अधिकाऱ्याने आपल्या विभागातील वरिष्ठ सहायकाविरोधात गोंदिया ग्रामीण पोलिसांत १ जुलै रोजी गंभीर तक्रार दाखल केली. त्या कर्मचाऱ्याने वारंवार फोन व मेसेज करून तिचा पाठलाग करीत त्रास देण्याचा सपाटा लावल्याचे ४२ वर्षीय महिला कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तिच्या तक्रारीवरून आरोपी वरिष्ठ सहायक बी. के. रणदिवे (५२, रा. ठाणा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा परिषदेच्या एका विभागातील ४२ वर्षीय कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी बी. के. रणदिवे हे सुरुवातीला कार्यालयीन संवादाच्या निमित्ताने त्या महिलेशी संपर्क साधायचे. 'लहान ताई' अशा संबोधनाने बोलत होते. मात्र, मागील काही महिन्यांपासून तो त्यांना वारंवार फोन करीत होता. व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून व्यत्यय आणायला सुरुवात केली. हा प्रकार इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही कळला होता. ३१ मे २०२५ रोजी ती महिला नागपूरला भावाकडे गेली असताना रणदिवे यांनी कोणतीही कल्पना न देता त्यांच्या गावी जाऊन कुलूप लावलेल्या घरासमोर उभे राहून मोबाइलने व्हिडीओ शूट केला. तसेच भाडेकरूंच्या घरासमोरचे दिवे सुरू करून तेथे उभे राहिल्याचा आरोप केला आहे. यानंतर जून महिन्यात रात्री १०:३० वाजता अर्जुनी-मोरगाव रेल्वेस्टेशनवर पोहोचल्या असता रणदिवे तिथे चारचाकी वाहनासह उपस्थित होते. त्याने 'आपकी रक्षा करने के लिये मैं आया हूं' असे म्हणत त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह धरला; परंतु गाडीत बसण्यास नकार दिल्यावरही त्याने पाठलाग सुरूच ठेवला. त्यावेळी त्या महिलेसोबत एक महिला असताना त्यांनाही गाडीत बसण्याचा आग्रह केला. महिला अधिकाऱ्याची रेकी करणाऱ्या त्या वरिष्ठ सहायकावर गोंदिया ग्रामीण पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम ७८ (२), ३५६ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिच्या नावाचा तयार केला 'व्हॉट्सअॅप ग्रुप'तक्रारकर्ती महिलेच्या नावाने आरोपीने 'व्हॉट्सअॅप ग्रुप' तयार करून त्यावर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जोडले. त्या ग्रुपमधील ५ कर्मचाऱ्यांना त्या महिलेची बदनामी करणारे आक्षेपार्ह पोस्ट त्याने केली.
तक्रार करूनही दखल न घेतल्याने पोलिसांत तक्रारत्या महिलेने रणदिवे याच्या कृत्याची तक्रार १६ जून रोजी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार लेखी स्वरूपात केली होती; परंतु वरिष्ठांनी कोणतीही कारवाई न केल्याने त्या महिलेला शेवटी गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
घराची रेकी करून दारातून आत पैसे टाकत होता
- २९ जूनला भूपेंद्र रणदिवे यांनी १ पुन्हा त्या महिलेच्या घरी जाऊन शेजाऱ्यांकडे विचारपूस केली.
- पैशांची गरज असल्याने पैसे 3 देतोय' असे सांगून त्यांच्या दरवाज्याच्या फटीतून पैसे टाकले. किती रक्कम ठेवली हे फिर्यादीला माहीत नाही.