शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

‘माफसू’च्या परीक्षांचे काय होणार? विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 09:09 IST

राज्यातील सर्वच अकृषी विद्यापीठांनी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मात्र ‘माफसू’च्या (महाराष्ट्र अ‍ॅनिमल अ‍ॅन्ड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी) परीक्षांबाबत विद्यापीठ प्रशासनाने कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

ठळक मुद्देअद्याप कुठलीही अधिकृत घोषणा नाही

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’मुळे देशभरात ‘लॉकडाऊन’ घोषित झाला असताना शैक्षणिक क्षेत्रात अनिश्चिततेचे वातावरण आहे. राज्यातील सर्वच अकृषी विद्यापीठांनी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मात्र ‘माफसू’च्या (महाराष्ट्र अ‍ॅनिमल अ‍ॅन्ड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी) परीक्षांबाबत विद्यापीठ प्रशासनाने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. पुढील महिन्यापासून परीक्षा सुरू होणार असल्या तरी अद्याप त्या पुढे ढकलण्यात येणार की नाही याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.‘लॉकडाऊन’च्या कालावधीत कुठल्याही परीक्षा घेण्यात येऊ नये असे राज्य शासनाचे निर्देश असल्याने अकृषी विद्यापीठांनी परीक्षा पुढे ढकलल्या. आता केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत जून महिन्यात आढावा घेण्यात येईल. परंतु ‘माफसू’च्या सत्र व वार्षिक परीक्षाच मुळात जून महिन्यात सुरू होतात. सर्वसाधारणत: ‘डेअरी टेक्नॉलॉजी’, ‘फिशरी सायन्स’च्या सत्र प्रणाली व ‘व्हेटरनरी सायन्स’च्या वार्षिक प्रणालीच्या परीक्षा जून ते ऑगस्ट या कालावधीत चालतात. महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत ‘लॉकडाऊन’ वाढविण्यात आला आहे. जर त्यानंतर ‘लॉकडाऊन’ संपला तरी विद्यार्थ्यांना गावांहून परत यायला व इतर प्रशासकीय प्रक्रियेसाठी वेळ लागेल. त्यामुळेच जूनपासून सुरू होणाऱ्या परीक्षा कशा होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने कुठलेही धोरण स्पष्ट केलेले नाही. वार्षिक परीक्षेविषयी कसल्याही प्रकारचे सूचनापत्र प्रकाशित केलेले नाही व संकेतस्थळावरदेखील कसलीही माहिती नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संभ्रमात आणखी वाढ झाली आहे.‘ऑनलाईन’ परीक्षा शक्य नाहीयासंदर्भात अद्याप निर्णय का झाला नाही याबाबत विविध पशुवैद्यकीय महाविद्यालयांकडून विद्यापीठाला विचारणा होत आहे. ‘ऑनलाईन’ परीक्षांबाबत विद्यापीठाने विचार करु नये, अशी अनेकांची भूमिका आहे. बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे ‘ऑनलाईन’ सुविधा उपलब्ध होतील की नाही हा प्रश्नच आहे. शिवाय तीनही विद्याशाखांमध्ये प्रात्यक्षिकांनादेखील महत्त्व आहे. त्यामुळे ‘ऑनलाईन’ परीक्षा घेणे शक्य नाही अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.अंतिम निर्णयासाठी प्रतीक्षाच‘माफसू’मधील अभ्यासक्रम हे भारतीय कृषी संशोधन परिषद व भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या किमान मापदंडांवर आधारित आहे. त्यांच्या नियमांच्या बाहेर जाता येत नाही. परीक्षा प्रणालीत बदल झाला तर विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीवर नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी हित समोर ठेवून पुढे काय पावले उचलायचे याबाबत विद्वत् परिषदेत मंथन करण्यात येईल. त्यानंतरच परीक्षांबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पशुवैद्यकीयशास्त्र अधिष्ठाता व ‘डायरेक्टर आॅफ इन्स्ट्रक्शन्स’ डॉ.ए.पी.सोमकुंवर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकूणच परीक्षांबाबत निर्णय व्हायला काही दिवस निश्चितच लागतील असे चित्र आहे.अंतिम निर्णयासाठी प्रतीक्षाच‘माफसू’मधील अभ्यासक्रम हे भारतीय कृषी संशोधन परिषद व भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या किमान मापदंडांवर आधारित आहे. त्यांच्या नियमांच्या बाहेर जाता येत नाही. परीक्षा प्रणालीत बदल झाला तर विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीवर नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी हित समोर ठेवून पुढे काय पावले उचलायचे याबाबत विद्वत् परिषदेत मंथन करण्यात येईल. त्यानंतरच परीक्षांबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पशुवैद्यकीयशास्त्र अधिष्ठाता व ‘डायरेक्टर आॅफ इन्स्ट्रक्शन्स’ डॉ.ए.पी.सोमकुंवर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकूणच परीक्षांबाबत निर्णय व्हायला काही दिवस निश्चितच लागतील असे चित्र आहे.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र