शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त पार्किंगचे काय ?

By admin | Updated: November 7, 2014 00:42 IST

शहरात रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये होत असलेल्या बेशिस्त पार्किंगमुळे नागपूरकर त्रस्त झाले आहेत. मनात येईल तेथे गाडी पार्क केल्यामुळे रस्ते रुंद होत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

नागरिक त्रस्त : न्यायालयाचे आदेश तरीही...नागपूर : शहरात रस्त्यांवर, बाजारपेठांमध्ये होत असलेल्या बेशिस्त पार्किंगमुळे नागपूरकर त्रस्त झाले आहेत. मनात येईल तेथे गाडी पार्क केल्यामुळे रस्ते रुंद होत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये मोठमोठे मॉल्स, रुग्णालये, हॉटेल आहेत. मात्र या इमारती बांधताना अनेक ठिकाणी पार्किंगच्या सुविधेचा नियम पाळण्यात आला नाही. परिणामी या भागातील रहिवाशांवर अनधिकृत पार्किग माथी मारली जात आहे. अशा गर्दीच्या ठिकाणावरून गाड्या चालविताना नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. ही तर तारेवरची कसरतमध्यवर्ती भागातील रहदारीच्या ठिकाणी गाड्यांची पार्किंग सर्वात मोठी डोकेदुखी आहे. रोजचे काम सोडून वाहन पार्किंगसाठी जागा शोधत फिरावे लागते. व्हेरायटी चौकातील इंटरनिटी मॉलला लागून एनआयटीचे वाहनतळ आहे. मात्र तिथे गाड्या लावणे मोठे कसरतीचे काम आहे. चहाच्या ठेल्यांचा कब्जाधंतोली परिसरातील अनेक रहदारीच्या ठिकाणी मनपाने वाहनांच्या पार्किंगसाठी जागा सोडली होती. मात्र त्यातील बहुतांश जागांवर चहाच्या ठेलाचालकांनी कब्जा मिळविला आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत या ठेल्यांवर ग्राहकांची जत्रा भरते. परिणामी या भागातील वाहनतळ सर्वात गंभीर समस्या आहे. भंगार व्यावसायिक मुजोरसीताबर्डी हा नागपुरातील सर्वात गजबजलेला बाजार आहे. या भागात मनपा आणि नागपूर सुधार प्रन्यासने पे अ‍ॅण्ड पार्कची व्यवस्था केली होती. प्रत्यक्षात त्याचा धिंगाणा झाला आहे. नागरिक मनाला वाट्टेल तिथे गाड्या पार्क करतात. जिथे थोडीफार जागा होती, तिथे भंगार दुकानदारांनी ताबा मिळविला आहे. तिथे गाड्या पार्क केल्या तर मुजोर झालेले हे व्यावसायिक गाड्या पंक्चर करतात. जागेची मारामारसीताबर्डी भागात वाहनांच्या पार्किंगची समस्या सर्वात भीषण आहे. काम पाच मिनिटांचे असते; मात्र गाडी पार्क करण्यासाठी तासन्तास शोधाशोध करावी लागते. हायकोर्टाने पुस्तक बाजाराच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्याचे आदेश देऊनही, तो बाजार अद्याप हटविण्यात आलेला नाही.