दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
By सुनील चरपे | Updated: August 12, 2025 08:35 IST2025-08-12T08:35:11+5:302025-08-12T08:35:58+5:30
पोलिसांनी पाठलाग केला, वाटेतील माणुसकीचे काय?

दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
सुनील चरपे
नागपूर : रक्षाबंधनासाठी गावाला जाताना अपघात झाला आणि पत्नी ग्यारसी अमित यादव (वय ३१) हिचा मृत्यू झाला. रस्त्यावर त्याला कुणीही मदत न केल्याने डोकं सुन्न झालेल्या पती अमित भुरा यादव (वय ३५) याने चक्क पत्नीचा मृतदेह मोटारसायकलवर मागे ठेवून परतीचा प्रवास सुरू केला. त्याच्या या ६५ कि.मी. प्रवासात त्याने चार पोलिस ठाण्यांच्या सीमा ओलांडल्या. महामार्ग वाहतूक पोलिसांनी त्याच्या दुचाकीचा पाठलाग करीत व्हिडीओ क्लिप तयार करून व्हायरल केली. त्याला रोडवर जाताना अनेकांनी बघितले. मात्र, त्याला धीर देत मदत करण्याची माणुसकी कुणीच का दाखवली नाही?
अमित व ग्यारसी मूळचे करणपूर, जिल्हा सिवनी, मध्य प्रदेश येथील रहिवासी. अमित हा पत्नीसह कोराडी नजीकच्या लोणारा येथे भाड्याने राहतो व बांधकामाच्या सेंटिंगची कामे करून उदरनिर्वाह करतो. तो रविवारी दुपारी मोटारसायकलने करणपूरला जायला निघाले होते.
चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
सुन्न डोक्याने व घाबरलेल्या अवस्थेत त्याने पत्नीचा मृतदेह चक्क दुचाकीवर मागे बांधला आणि करणपूरला जाण्याऐवजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास लोणारा येथे परत यायला निघाला. सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास तो पत्नीचा मृतदेह घेऊन लोणारा येथे घरी पोहोचला.
या अडीच तासांच्या प्रवासात त्याने चार पोलिस ठाण्यांच्या सीमा, टोल प्लाझा, आरटीओ चेकपोस्ट, चार मोठी व किमान १५ छोटी गावे ओलांडली तरी कोणीही विचारपूस केली नाही. दोन महामार्गावर प्रवास करणाऱ्या अनेकांना तो दिसला. पण, कुणाच्या हृदयात माणुसकी जागी झाली नाही.
दुचाकीचा क्रमांक व पोलिस घरी: नियंत्रण कक्षाने अमितच्या दुचाकीच्या क्रमांकावरून त्याचा पत्ता शोधला व कोराडी पोलिसांना सूचना दिली. सायंकाळी कोराडी पोलिस त्याच्या घरी पोहोचले, तेव्हा तो घरी पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून होता. पोलिसांनी चौकशी करून मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठविला.
धोधो पावसात अपघात, मदतीला कोणीच थांबेना
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मोरफाट्याजवळ मागून आलेल्या ट्रकने कट मारल्याने दोघेही रस्त्यावर पडले. क्षणभर डोळ्यासमोर अंधारी आली होती. नाही. तेव्हा पत्नीचा मृतदेह दुचाकीला ग्यारसी ही ट्रकच्या बाजूने पडल्याने चाकाखाली आली आणि तिचा मृत्यू झाला. त्यावेळी जोरात पाऊस सुरू होता. तो रोडवरून जाणाऱ्यांना मदत मागत असताना कुणीही त्याच्याजवळ थांबले नाही किंवा पोलिसांना सूचना दिली बांधला आणि वाटचाल सुरू केली.