मॉर्निंग वॉकला गेले अन् महिलेच्या दुचाकीमुळे झाला मृत्यू

By योगेश पांडे | Updated: November 9, 2023 16:13 IST2023-11-09T16:10:47+5:302023-11-09T16:13:59+5:30

ज्येष्ठ नागरिक अभियंत्याचा विनाकारण गेला बळी

Went for a morning walk and died due to a woman's bike | मॉर्निंग वॉकला गेले अन् महिलेच्या दुचाकीमुळे झाला मृत्यू

मॉर्निंग वॉकला गेले अन् महिलेच्या दुचाकीमुळे झाला मृत्यू

नागपूर : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिक अभियंत्याला भरधाव वेगातील महिला दुचाकीचालकाने धडक दिली व त्यात जखमी अभियंत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

उत्तम मणिराम पवार (५५, मंगलदीपनगर, मानेवाडा, बेसा मार्ग) असे मृतक व्यक्तीचे नाव आहे. ते दररोज अशोक मून, सुरेश डांगे या मित्रांसोबत सकाळी फिरायला जायचे. ४ नोव्हेंबर रोजी दररोजप्रमाणे ते पावणेसहाच्या सुमारास मॉर्निंग वॉक करत असताना एमएच ४९ बीएन ५४६२ या क्रमांकाच्या दुचाकीवरील महिला वेगात आली व तिने पवार यांना मागून धडक दिली. दुचाकीचा वेग जास्त असल्याने पवार हे खाली पडले व गंभीर जखमी झाले. त्यांना डांगे व मून यांनी छत्रपती चौकातील इस्पितळात नेले. मात्र तेथे डॉक्टर नसल्याने मग दुसऱ्या एका इस्पितळात घेऊन गेले. उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. अशोक मून यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Went for a morning walk and died due to a woman's bike