कोरोनापासून वाचण्यासाठी जलनीती व सूत्रनीती योग ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST2021-04-07T04:08:33+5:302021-04-07T04:08:33+5:30

नागपूर : कोरोना महामारीने आरोग्याच्या सुरक्षेबाबत गंभीरता वाढवली आहे आणि आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल तर शारीरिक सुदृढता ही महत्त्वाची ...

Water Policy and Strategy Yoga to Read from Corona () | कोरोनापासून वाचण्यासाठी जलनीती व सूत्रनीती योग ()

कोरोनापासून वाचण्यासाठी जलनीती व सूत्रनीती योग ()

नागपूर : कोरोना महामारीने आरोग्याच्या सुरक्षेबाबत गंभीरता वाढवली आहे आणि आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल तर शारीरिक सुदृढता ही महत्त्वाची आहे, हे आता लोकांना कळून चुकले आहे. सुदृढता ठेवायची असेल तर योग हा सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. या महामारीत योगाचे महत्त्व सर्वश्रुत झाले आहे. मात्र नेमके कोरोनापासून सुरक्षित राहायचे असेल तर त्याचेही उपाय यात आहेत. ‘जलनीती’ आणि ‘सूत्रनीती’ या पद्धती म्हणजे नाशिका (नाक) व घशाची शुद्धीक्रिया करण्यास उपयोगी असून याद्वारे कोरोनाला दूर ठेवले जाऊ शकते.

योगामध्ये पीएच.डी प्राप्त योगतज्ज्ञ डॉ. संजय खडतकर यांनी या दोन्ही पद्धतीबाबत सविस्तर माहिती दिली. जलनीती म्हणजे नाशिका शुद्धिकरण प्रक्रिया होय. यामध्ये उजव्या नाशिकेतून टाकलेले पाणी डाव्या नाशिकेमधून काढले जाते. काेमट पाणी, त्यात दुधाचा अंश, थाेडंसं मीठ आणि लिंबाच्या रसाचे एक-दाेन थेंब मिश्रित करून नाशिकेमध्ये टाकून दुसऱ्या नाशिकेद्वारे काढावे. यामुळे नाकाची शुद्धता हाेते व श्वास प्रश्वासाच्या समस्या निर्माण हाेत नसल्याचे डाॅ. खडतकर यांनी सांगितले. दुसरी क्रिया म्हणजे सूत्रनीती हाेय. कॅथेट्राप्रमाणे असलेले सूत्र नाशिकेमधून टाकून घशातून बाहेर काढली जाते. सुरुवातीला उजव्या नाशिकेतून टाकून सूत्रनीती प्रक्रिया करावी व नंतर डाव्या नाशिकेतून कॅथेट्रा टाकून तीच प्रक्रिया करावी. याद्वारे घशाची शुद्धता करणे शक्य हाेते. या दाेन्ही प्रक्रिया महत्त्वाच्या असून याद्वारे काेराेनाचा प्रतिकार करणे शक्य हाेते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय प्राणायामसह याेगाच्या सर्व क्रिया आराेग्य सुदृढ ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असून विना खर्च आपण आजारांपासून दूर राहू शकताे, असा मंत्र डाॅ. खडतकर यांनी दिला.

Web Title: Water Policy and Strategy Yoga to Read from Corona ()