नागपूर शहराचे पाणी वाढले : १७३.५०० दलघमी पाणी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 10:46 PM2020-12-21T22:46:42+5:302020-12-21T22:48:12+5:30

Water of Nagpur city increased नागपूरकरांना नववर्षासाठी गुड न्यूज आहे. शहराला मिळणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी नागपूर शहरासाठी १५४ दलघमी पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. यावेळी त्यात वाढ करून १७३.५०० दलघमी इतके पाणी आरक्षित केले जाणार आहे.

Water of Nagpur city increased: 173,500 gallons of water will be available | नागपूर शहराचे पाणी वाढले : १७३.५०० दलघमी पाणी मिळणार

नागपूर शहराचे पाणी वाढले : १७३.५०० दलघमी पाणी मिळणार

Next
ठळक मुद्दे पाणी आरक्षणाला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूरकरांना नववर्षासाठी गुड न्यूज आहे. शहराला मिळणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी नागपूर शहरासाठी १५४ दलघमी पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. यावेळी त्यात वाढ करून १७३.५०० दलघमी इतके पाणी आरक्षित केले जाणार आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी पाणी आरक्षण बैठकीत संबंधित निर्देश दिले. त्यामुळे आता नागपूरचा पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागला आहे.

नागपूर शहराला दररोज ६४० एमएलडी पाणी लागते. गेल्यावर्षी प्रत्यक्षात १५६ दलघमी पाणी वापरण्यात आले होते. यावर्षी कोरोना काळात नेहमीपेक्षा कमी पाणी वापरण्यात आले. त्यामुळे जून २०२१ पर्यंत १५२ दलघमी पाणी प्रत्यक्षात वापरले जाईल, असा अंदाज आहे. पाणी आरक्षणासंदर्भात सोमवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनपाने वर्ष २०२०-२१ साठी पेंच प्रकल्पांतर्गत तोतलाडोह धरणातून १७३.५०० दलघमी पाणी देण्याची मागणी केली होती. पालकमंत्र्यांनी ही मागणी तात्काळ मंजूर करण्याचे निर्देश दिले. बैठकीत जिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नागपूरचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी, लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे उपस्थित होते. या वर्षी घरगुती व औद्योगिक वापराच्या पाण्याची जितकी मागणी आहे. त्यानुसार पुरेसे पाणी उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत सिंचन विभागाने पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली.

अशी आहे मागणी

 घरघुती व औद्योगिक दोन्ही मिळून नोव्हेंबर २०२० ते जून २०२१ पर्यंत जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांतून १५१.४१ दलघमी पाणी वापरले जाईल. मध्यम प्रकल्पातून १९.४२ दलघमी व लघु प्रकल्पातून ३.२९ दलघमी पाणी वापरले जाईल. तसेच नदीवरून असणाऱ्या पाणी पुरवठ्याची मागणी ५६.१७५ दलघमी आहे.

जिल्ह्यात ७७ प्रकल्पात १५६४.४ दलघमी पाणी उपलब्ध

 नागपूर जिल्ह्यात एकूण ७७ प्रकल्प आहेत. यात ५ मोठे, १२ मध्यम व ६० लघु प्रकल्प आहे. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे या प्रकल्पांमध्ये एकूण ८९.५६ टक्के पाणीसाठी आहे. या प्रकल्पांची एकूण पाणीसाठा क्षमता १७७७.७३ दलघमी इतकी आहे. एकूण १५६४.४ दलघमी पाणी उपलब्ध आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये १२७७.३० दलघमी, मध्यम प्रकल्पात १६०.५ व लघु प्रकल्पांमध्ये १२७.०५ दलघमी इतके पाणी आहे.

Web Title: Water of Nagpur city increased: 173,500 gallons of water will be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.