शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याला पैशाचे मूल्य!

By admin | Updated: April 24, 2016 03:12 IST

आज अख्खा महाराष्ट्र पाण्यासाठी व्याकुळ झाला आहे. भीषण पाणी टंचाईच्या झळा सोसत आहे. मराठवाड्यात तर फारच बिकट स्थिती निर्माण झाली आहे.

जलक्रांतीची गरज : महाराष्ट्र पाण्यासाठी व्याकुळजीवन रामावत  नागपूरआज अख्खा महाराष्ट्र पाण्यासाठी व्याकुळ झाला आहे. भीषण पाणी टंचाईच्या झळा सोसत आहे. मराठवाड्यात तर फारच बिकट स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातील शहरी भागात पाणीटंचाई दिसून येत नसली, तरी ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासाठी अनेकांना गावे सोडावी लागली आहेत. या दुष्काळग्रस्त भागातील लोकांसाठी आज पाणी पैशापेक्षाही मौल्यवान झाले आहे. कारण त्यांना पैसे देऊनसुद्धा पाणी विकत मिळत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पाणी हे जीवन आहे! यात कुणाचेही दुमत नाही. मात्र दुष्काळी भागातील परिस्थिती पाहता पाणी ही अमूल्य संपत्ती आहे, हे सुद्धा सिद्घ झाले आहे. उद्या २४ एप्रिल रोजी जगभरात ‘जलसंपत्ती दिन’ साजरा केला जाणार आहे, या निमित्त सर्वांनी पाण्याचे महत्व समजून त्याचे व्यवस्थापन करण्याची शपथ घेण्याची गरज निर्माण झाली आहे.भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रातील बराच प्रदेश हा पर्जन्यछायेत येतो. त्यामुळे या भागात मुळातच पाऊस कमी पडतो. त्याचवेळी वाढते प्रदूषण, कार्बन उत्सर्जन, आणि तापमान, या वातावरणातील बदलामुळे पाऊस हा लहरी झाला आहे. परिणामत: राज्यातील तीन लाख आठ हजार चौ. किलोमीटर एवढ्या भौगोलिक क्षेत्रापैकी एक लाख ९४ हजार ४७३ चौ. किलोमीटर म्हणजे ६३.१४ टक्के क्षेत्र दुष्काळी भागात आहे. निश्चितच ही चिंतेची बाब आहे. यावर वेळीच दीर्घकालीन उपाययोजना शोधण्याची आज गरज निर्माण झाली आहे. अन्यथा महाराष्ट्रातील हा भाग वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही. जलतज्ज्ञांच्या मते, भविष्यातील हे संकट आपण आजच थोपवायला हवे. सोबतच या जलसंकटात आपण पाण्याचा कुठे आणि किती वापर करतो, कशासाठी आणि केव्हा करतो, याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवाय पाणी बचतीचे विविध उपाय शोधावे लागतील. यात अग्रक्रमाने पावसाचे पाणी अडवून, साठवून, त्याला झिरपायला लावून त्याचा उपयोग करावा लागेल. पावसाच्या पाण्याच्या संधारणाचे यापूर्वी अनेक प्रयोग झाले आहेत. ते रोड मॉडेल डोळ्यासमारे ठेवून, त्यातून शिकावे लागेल. शिवाय एक चळवळ उभी करून, राज्यात जलक्रांती करावी लागेल. राज्यभरात पाणी वापराचे कडक नियम करावे लागतील. पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य आणि त्यानंतर शेती या धोरणाची कठोर अंमलबजावणी करावी लागेल. या पाणी बचतीसोबतच पाणलोट क्षेत्र विकास कामांना प्राधान्य द्यावे लागेल. पाणी अडवा, पाणी मुरवा आणि पाणी जिरवा हा कार्यक्रम राबवला पाहिजे. अधिक प्रभावीपणे राबवावा लागेल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)ठोस कार्यक्रम हवा राज्यात पावसाळ्यातील चार महिने भरपूर पाऊस पडतो. मात्र पावसाचे पाणी अडविण्याच्या पुरेशा सुविधा निर्माण न केल्याने बहुतेक पाणी वाहून जाते. यामुळे पावसाळ्यातील चार महिने सोडल्यास राज्यातील बहुतेक नद्या कोरड्या असतात. महाराष्ट्रात भारतातील सर्वात जास्त धरणे असली तरी, धरणातील उपयुक्त पाणीसाठ्याचे प्रमाण फारच कमी आहे. राज्यात एखाद्या वर्षी चांगला पाऊस झाला की उर्वरित दोन तीन वर्षे पाणी टंचाईची असतात. चांगला पाऊस झालेल्या वर्षी धरणातील पाणी खाली सोडून द्यावे लागते यामुळे धरणाच्या खालच्या भागांत पुराची स्थिती निर्माण होते. ही बाब टाळण्यासाठी राज्यातील धरणांची पाणी साठवणक्षमता वाढविण्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे.