नगरपालिका व नगरपंचायतींची प्रभाग रचना झाली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:37 IST2025-08-19T14:34:56+5:302025-08-19T14:37:16+5:30

Nagpur : ३१ ऑगस्टपर्यंत नोंदविता येणार आक्षेप व सूचना, भौगोलिक सीमा प्रसिद्ध

Ward structure of municipalities and municipal councils announced | नगरपालिका व नगरपंचायतींची प्रभाग रचना झाली जाहीर

Ward structure of municipalities and municipal councils announced

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
राज्य निवडणूक आयोगाने २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजवत नागपूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यातील १४ नगरपालिका आणि १३ नगरपंचायतींमध्ये या वेळेस जनतेला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. १८ ऑगस्ट रोजी प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध केली असून त्यावर ३१ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. त्यानंतर प्रभाग आरक्षण व अंतिम आराखडा निश्चित होईल.


नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये लोकसंख्येच्या आधारे प्रभागांचे पुनर्रचना व आरक्षण करण्यात येणार असून प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धीची अधिसूचना सोमवारी १८ ऑगस्ट २०२५ रोजी जारी केली आहे. त्यावर ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत नागरिक, स्थानिक स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष व इतर हितधारकांकडून लेखी स्वरूपात नगरपालिका व हरकती/सूचना नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करता येतील. हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणीकरिता उपस्थित राहण्याकरिता स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. गोधनी आणि बेसा पिपळा या दोन प्रदेशांमध्ये नगरपंचायतचे रूपांतर झाल्यापासून प्रथमच निवडणुका होणार आहेत. 


कार्यक्रमातील महत्त्वाचे टप्पे
प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धी अधिसूचना
दिनांक : १८ ऑगस्ट २०२५
जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध
हरकती व सूचना स्वीकारण्याचा कालावधी
दिनांक : १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५


निवडणूक होणाऱ्या नगरपालिका : कामठी, उमरेड, वाडी, काटोल, रामटेक, खापा, सावनेर, कळमेश्वर, नरखेड, मोहपा, मोवाड, वानाडोंगरी, बुटीबोरी, कन्हान पिपरी.
नगरपंचायती : भिवापूर, कुही, २ महादुला, मौदा, पारशिवनी, कांद्री (कन्हान), बेसा पिपळा, बहादुरा, नीलडोह, कोंढाळी, बिडगाव तरोडी, गोधनी, येरखेडा.

Web Title: Ward structure of municipalities and municipal councils announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर