शहरं
Join us  
Trending Stories
1
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
2
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
3
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
4
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ST खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी थोडक्यात बचावले
5
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
6
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
7
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
8
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
9
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
10
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
11
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
12
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
13
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
14
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
15
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
16
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
17
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
18
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
19
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
20
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

हरणांची पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: May 16, 2014 00:50 IST

जंगलातील हरीण पिण्याच्या पाण्याच्या शोधात भटकंती करू लागले आहेत. त्यापैकी काही हरीण थेट गावांमध्ये शिरत आहे. अशाच बुधवारी कामठी वस्तीत शिरलेल्या एका हरणावर कुत्र्यांनी हल्ला चढवून,

एकाचा मृत्यू : दुसरा गंभीर जखमी

नागपूर : जंगलातील हरीण पिण्याच्या पाण्याच्या शोधात भटकंती करू लागले आहेत. त्यापैकी काही हरीण थेट गावांमध्ये शिरत आहे. अशाच बुधवारी कामठी वस्तीत शिरलेल्या एका हरणावर कुत्र्यांनी हल्ला चढवून, त्याला जखमी केल्याची घटना पुढे आली आहे. शिवाय दुसरे एक हरीण मृतावस्थेत आढळून आले आहे. या दोन्ही घटनांनी वन्यप्राण्यांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला आहे. वन विभाग जंगलात वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था केली असल्याचे सांगत आहे. त्यावर दरवर्षी कोट्यवधीचा निधीही खर्च केला जात आहे. मात्र या दोन्ही घटनांनी वन विभागाची चांगलीच पोलखोल केली आहे.

माहिती सूत्रानुसार बुधवारी जंगलातून भटकलेले एक हरीण कामठी येथील सैनिकी छावणी परिसरात शिरले होते.

कुत्र्यांना ते दिसताच, त्याच्यावर हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. काही जागृत नागरिकांनी त्या कुत्र्यांच्या हल्ल्यातून त्याला वाचविले. शिवाय घटनेची लगेच वन विभागाला माहिती देण्यात आली. यानंतर त्या जखमी हरणाला उपचारासाठी नागपुरात आणण्यात आले. येथे त्याच्यावर उपचार करून, सध्या त्याला सेमिनरी हिल्स येथील मृग विहारात ठेवण्यात आले आहे. मात्र त्याची स्थिती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. यापाठोपाठ गुरुवारी सकाळी पुन्हा त्याच परिसरात एक हरीण मृतावस्थेत आढळून आले. त्याचे पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन केले असता, डॉक्टरांनी घाबरल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)