शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवर फिरणाऱ्या रिकामटेकड्यांचा बंदोबस्त हवाच : पोलिसांनी कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 00:49 IST

देशभरात ‘लॉकडाऊन’ असतानादेखील नागपुरात काही रिकामटेकडे काहीही आपात्कालीन कार्य नसताना रस्त्यांवर फिरताना तसेच घोळका करून गप्पा हाकताना दिसून येत आहेत.

ठळक मुद्देअतिशहाण्यांना धडा शिकविलाच पाहिजे, कसा होणार ‘कोरोना’चा बंदोबस्त

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’च्या ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांमध्ये वाढ होणे ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. अशा स्थितीत ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखणे अनिवार्य झाले आहे; परंतु देशभरात ‘लॉकडाऊन’ असतानादेखील नागपुरात काही रिकामटेकडे काहीही आपात्कालीन कार्य नसताना रस्त्यांवर फिरताना तसेच घोळका करून गप्पा हाकताना दिसून येत आहेत. अशा सर्व लोकांवर कठोर कारवाई करून पोलिसांनी त्यांच्यातील ‘अतिहुशारी’ बाहेर काढण्याची वेळ आली आहे. असे केले तरच ‘कोरोना’चा खऱ्याअर्थाने संसर्ग टाळल्या जाऊ शकतो.

‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी शुक्रवारी सायंकाळी व शनिवारी दिवसभर शहरातील विविध भागांची पाहणी केली. यादरम्यान अतिशय धक्कादायक बाबी दिसून आल्या. कडेकोट बंदोबस्त असलेले चौक वगळता बऱ्याच ठिकाणी रिकामटेकडे बिनधास्तपणे गाड्यांवर फिरताना दिसून आले. काही जणांना विचारणा केली असता अगदी थातूरमातूर कारणे दिली. प्रत्यक्षात आपात्कालीन सेवेत असणाऱ्यांनीच घराबाहेर निघावे, असे प्रशासनाचे निर्देश आहेत. किराणा, भाजी आणण्यासाठी निघाले तर तेदेखील समजू शकतो. परंतु काहीच काम नसताना एखाद्या मित्राकडे किंवा नातेवाईकाकडे जाण्याचे प्रकार सुरू आहेत.याशिवाय काही चौकांत तर स्थानिक रहिवासी एकत्रित येऊन गप्पा मारतानादेखील दिसून आले. अशा सर्व लोकांवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. अशा लोकांना ‘कोरोना’ची लागण होण्याचा सर्वात जास्त धोका असून ते त्याचे वाहक बनू शकतात. त्यामुळे पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.अंतर्गत भागातदेखील ‘पॅट्रोलिंग’ हवेसाधारणत: शहरातील चौक, मुख्य रस्ते येथे पोलीस कर्मचारी तैनात आहेत. परंतु शहरातील गल्लीबोळात मात्र लोक निर्धास्तपणे फिरत आहेत. किराणा दुकान, भाजीच्या ठेल्यांवर गर्दी करत आहेत. गोपालनगरात तर एका ठिकाणी रोज गल्लीत क्रिकेटचे सामने रंगत आहेत. अशा स्थितीत पोलिसांनी अंतर्गत भागातदेखील ‘पॅट्रोलिंग’ वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.नागरिकांनो, तुम्हीच स्वत:चा जीव वाचवा‘कोरोना’चे संकट आणखी वाढण्यास सुरुवात झाली आहे. या आजारावर नियंत्रण मिळवायचे असेल तर एकमेकांपासून अंतर राखणे अनिवार्य आहे. मात्र अद्यापही शहरातील अनेक नागरिकांना याची गंभीरता लक्षात आलेली नाही. ‘कुछ नहीं होता’ याच आविर्भावात ते आहेत. मात्र स्वत:चा आणि कुटुंबातील जीवलगांचा जीव वाचविणे हे त्यांच्याच हाती आहे. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत घरीच राहणे हे सर्वांच्या फायद्याचे ठरणार आहे. यासाठी सर्वांनी संयम राखला पाहिजे.थेट पोलिसांना कळवाप्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवणे हे पोलिसांनादेखील शक्य नाही. अशा स्थितीत तुमच्या सोसायटी, कॉलनी अथवा आजूबाजूच्या भागात कुणी विनाकारण घराबाहेर येऊन गप्पा मारत असतील, ‘सोशल डिस्टन्सिंग’ची गंभीरता राखत नसतील तर थेट पोलीस किंवा प्रशासनाला याची माहिती देऊ शकता. ‘कोरोना’विरोधातील या लढाईत सर्वांनी एकत्रित लढण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस