शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

मान्सूनच्या प्रतीक्षेत धरणे आटली : प्रशासन चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:51 PM

जून महिन्याचा तिसरा आठवडा सुरु आहे. परंतु मान्सूनचा पत्ता नाही. एकीकडे उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. तर दुसरीकडे पाण्याअभावी धरणेही आटली आहेत. नागपूर विभागातील १८ मोठ्या धरणांपैकी तब्बल ६ धरणे कोरडी पडली असून एकूण धरणात केवळ ५ .०२ टक्के इतका साठा शिल्लक आहे. नागपुरात केवळ ३० जूनपर्यंत पुरेल इतकेच पिण्याचे पाणी आहे. तेव्हा येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनही चिंतेत पडले आहे.

ठळक मुद्देनागपूर विभागात केवळ पाच टक्के साठा शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जून महिन्याचा तिसरा आठवडा सुरु आहे. परंतु मान्सूनचा पत्ता नाही. एकीकडे उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. तर दुसरीकडे पाण्याअभावी धरणेही आटली आहेत. नागपूर विभागातील १८ मोठ्या धरणांपैकी तब्बल ६ धरणे कोरडी पडली असून एकूण धरणात केवळ ५ .०२ टक्के इतका साठा शिल्लक आहे. नागपुरात केवळ ३० जूनपर्यंत पुरेल इतकेच पिण्याचे पाणी आहे. तेव्हा येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनही चिंतेत पडले आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठी धरणे आहेत. त्याची एकूण पाणीसाठवण्याची क्षमता ही ३५५३.७७ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला म्हणजे १९ जून रोजी केवळ १७८.३६ दलघमी म्हणजेच केवळ ५.२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी तोतलाडोह, लोअर नांद वणा, गडचिरोलीतील दिना, वर्धा येथील पोथरा, भंडाऱ्यातील गोसेखुर्द आणि बावनथडी ही धरणे पूर्णपणे आटली आहेत. उर्वरित प्रकल्पांपैकी कामठी खेरी येथे २३.९८ टक्के, रामटेकमध्ये ७.५० टक्के, वडगाव १०.४ टक्के, इटियाडोह १६ .२७ टक्के, सिरपूर १८.२६ टक्के, पुजारी टोला ९.९२ टक्के, कालिसरार २२.४६ टक्के, असोलामेंढा २४.३८ टक्के, बोर १०.४१, धांम ०.२४ टक्के, लोअर वर्धा टप्पा १ २.३२ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ येथे २.४५ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. येत्या काही दिवसात पाऊस न आल्यास परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता आहे.पाच वर्षातील पाणीसाठा स्थितीवर्ष         मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा (१९ जून रोजी)२०१९ - १७८.३६ दलघमी२०१८ - ३८१.४२ दलघमी२०१७ - २९७.८६ दलघमी२०१६ - ६४६ दलघमी२०१५ - ७२० दलघमी२०१४ - १४५०.८० दलघमी

 

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई