नागपूर मेट्रोला व्हीएनआयटीचा आधार

By Admin | Updated: June 12, 2015 02:53 IST2015-06-12T02:53:51+5:302015-06-12T02:53:51+5:30

उपराजधानीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर मेट्रो रेल्वेला विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचा

VNIT base for Nagpur Metro | नागपूर मेट्रोला व्हीएनआयटीचा आधार

नागपूर मेट्रोला व्हीएनआयटीचा आधार

महत्त्वाकांक्षी प्रकल्प : तांत्रिक सहकार्यासाठी होणार करार
नागपूर : उपराजधानीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर मेट्रो रेल्वेला विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचा (व्हीएनआयटी) आधार मिळणार आहे. हा अत्यंत तांत्रिक प्रकल्प असल्यामुळे नागपूर मेट्रो रेल कार्पोरेशनने ‘व्हीएनआयटी’चे सहकार्य घेण्याचा निर्णय घेतला आहे.
‘व्हीएनआयटी’ ही देशातील प्रतिष्ठित संस्था आहे. कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी गुरुवारी ‘व्हीएनआयटी’चे अध्यक्ष विश्वास जामदार व अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. जामदार यांनी कार्पोरेशनसोबत सामंजस्य करार करण्यास सहमती दर्शविली आहे. करारावर लवकरच स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या प्रगतीकरिता ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे.
दीक्षित यांनी प्रकल्पांची विस्तृत माहिती दिल्यानंतर प्रकल्पासंदर्भात विविध सूचना करणे, बांधकामाची गुणवत्ता व रचना, वीज यंत्रणा, सिग्नल व संचार व्यवस्था, खोदकाम अभियांत्रिकी व वास्तू नियोजन इत्यादी माध्यमाद्वारे प्रकल्पाशी जुळावे अशी विनंती ‘व्हीएनआयटी’ला केली. जामदार यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ‘व्हीएनआयटी’ची तांत्रिक मदत उपयोगी सिद्ध होईल असे मत व्यक्त केले तर, ‘व्हीएनआयटी’चे संचालक प्रा. नरेंद्र चौधरी यांनी संस्थेच्या विविध विभागांतील तांत्रिक सुविधांची माहिती दिली. कुलसचिव प्रा. राजेंद्र येरपुडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील भट, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. एस. आर. भिडे, आर्किटेक्चर विभाग प्रमुख डॉ. राजश्री कोठारकर, डॉ. पी. एस. कुलकर्णी, प्रा. व्ही. एस. अडाणे, प्रा. व्ही. एस. कापसे, के. एकबोटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
४‘व्हीएनआयटी’ कार्यशाळा आयोजित करून नागपूर मेट्रो रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देईल असे प्रस्तावित आहे. मेट्रो रेल्वेस्थानकांची वास्तूरचना ठविण्याच्या प्रक्रियेतही ‘व्हीएनआयटी’ सहभागी होणार आहे. तसेच, सामंजस्य करारामुळे ‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांना प्रकल्पातील तांत्रिकता समजून घेण्याची संधी मिळणार आहे.

Web Title: VNIT base for Nagpur Metro