लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहुजन समाज पार्टी (बसपा) च्या जिल्हाध्यक्षपदी विलास सोमकुवर तर शहराध्यक्षपदी प्रकाश गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी रविभवन येथे आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली.बसपा प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे व महाराष्ट्र प्रभारी खा वीरसिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत कृष्णा बेले, संदीप ताजणे, जितेंद्र म्हैसकर प्रामुख्याने उपस्थित होते. महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती या बैठकीत करण्यात आली. यात सर्वात महत्त्वाची निवड म्हणजे नागपूरचे जिल्हाध्यक्षांची होय. सध्याचे जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर यांना प्रदेश सचिव पदावर बढती देऊन विलास सोमकुवंर यांची निवड करण्यात आली. सोमकुंवर हे उत्तर नागपूर विधानसभेचे महासचिव होते. त्यांना जिल्हाध्यक्ष पदावर बढती देऊन पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. यासोबतच पृथ्वी शेंडे, मंगेश ठाकरे यांची प्रदेश महासचिव आणि प्रेम रोडेकर, रुपचंद चोपणे, सुनील डोंगरे यांची सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली.येत्या निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देणारपक्षाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. लवकरच निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत बसपाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू संघटना वाढीसोबतच पक्षाला विधानसभा व लोकसभा निवडणुकीत निवडणुकीत यश मिळवून देणार.विलास सोमकुवरनवनियुक्त जिल्हाध्यक्ष
विलास सोमकुवर बसपाचे नवे नागपूर जिल्हाध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 23:24 IST
बहुजन समाज पार्टी (बसपा) च्या जिल्हाध्यक्षपदी विलास सोमकुवर तर शहराध्यक्षपदी प्रकाश गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी रविभवन येथे आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली.
विलास सोमकुवर बसपाचे नवे नागपूर जिल्हाध्यक्ष
ठळक मुद्देनागोराव जयकर यांची प्रदेशावर नियुक्ती : प्रकाश गजभिये शहराध्यक्ष