शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

वैद्य दाम्पत्याचा खून करणाऱ्यास कठोर शिक्षा करा

By admin | Updated: November 14, 2016 02:57 IST

काशीनगर रामेश्वरी येथील वैद्य दाम्पत्याच्या खुनाचा तीव्र निषेध करीत आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी

बसपाची मागणी : बीआरएसपीचे पाटील पक्षाला बदनाम करीत असल्याचा आरोप नागपूर : काशीनगर रामेश्वरी येथील वैद्य दाम्पत्याच्या खुनाचा तीव्र निषेध करीत आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी बसपाचे प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले यांनी केली असून बसपामधून निष्कासित करण्यात आलेले बीआरएसपीचे सिद्धार्थ पाटील हे बसपाला बदनाम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात बेले यांनी म्हटले आहे, पंढरीनाथ वैद्य यांनी त्यांचे ३७२५ चौ. फुटाच्या भूखंडापैकी ३४० चौ. फूट जागा बसपा कार्यालयासाठी दिली होती. या प्लॉटला लागूनच सिद्धार्थ पाटील यांचा प्लॉट आहे. पाटील यांनी अनेकदा वैद्य कुटुंबाकडे त्यांचा प्लॉट खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु वैद्य कुटुंबाला पाटील यांच्यावर विश्वास नव्हता. वैद्य कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावल्याने पंढरीनाथ यांच्या पत्नी प्रमिला वैद्य व इतर सदस्यांनी बसपाला प्लॉट विक्रीसाठी लिखित परवानगी मागितली होती. परंतु त्यांनी बसपाकडून मंजुरी मिळण्यापूर्वीच बिल्डरसोबत सौदा केला. यात बसपाचा कुठलाही हस्तक्षेप नव्हता. त्यानंतर बिल्डर आणि प्रमिला वैद्य यांनी बसपाच्या ३४० चौ. फुटाच्या जागेऐवजी नवीन इमारतीमध्ये १००० चौ. फुटाचे पार्टी कार्यालय देण्याचा करार करून रजिस्ट्री केली. यापूर्वी पाटील यांनी संबंधित प्लॉटचे जुने बांधकाम पाडण्यासाठी नासुप्र आणि मनपाकडे अर्ज सुद्धा केला होता. परंतु दुसऱ्यालाच भूखंड विकल्यामुळे पाटील संतापले होते. कुठलेही काम न करता पाटील यांच्याकडे प्लॉट, लॉन आदी कोट्यवधीची संपत्ती आली कुठून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही बेले यांनी केली आहे.