नागपूर : गेल्या काही दिवसापासून उकाड्याचा त्रास वाढला असतानाच रविवारी मध्यरात्रीनंतर अचानक वादळी पावसाने जाेरदार हजेरी लावली. त्यामुळे उन्हाची काहीली कमी हाेऊन वातावरणात काहीसा गारवा वाढल्याचे चित्र हाेते. विदर्भात विशेषत: नागपूर, गाेंदिया व भंडारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची नाेंद झाली आणि वादळाचा तडाखाही बसला. विदर्भाच्या बहुतेक जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे.
रविवारी दिवसभर उन्हाचा पारा चांगलाच वाढला हाेता. नागपूरचे कमाल तापमान ३४ अंश व रात्रीचे तापमान १७ अंशापर्यंत गेले हाेते. इतर जिल्ह्यातही तापमान ३४ ते ३६ अंशापर्यंत चढले आहे. रात्रीही उकाडा जाणवत हाेता. मध्य रात्रीनंतर मात्र अचानक वातावरण पूर्णपणे बदलले. साेसाट्याचा वारा वेगाने वाहत असताना विजांचाही कडकडाट हाेत राहिला. पहाटे ४ वाजताच्या दरम्यान ढगांच्या गडगडाटासह पावसाने जाेरदार धडक दिली. जाेराच्या सरींसह बरसणारा पाऊस सकाळी ६ वाजतादरम्यान थांबला. नागपुरात १०.९ मि.मी., भंडारा येथे १० मिमी व गाेंदियात २.४ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. वादळामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या. जिवितहानीची मात्र कुठेही नाेंद झाली नाही. सकाळपासून नागपूर शहरात ढग शांत हाेते, मात्र जिल्ह्यात हिंगणा, बुटीबाेरी, भिवापूर भागात हलक्या सरी बरसल्या. दुसरीकडे वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
तीन दिवस येलाे अलर्ट
यंदा संपूर्ण हिवाळ्यात एकदाही पावसाची नाेंद झाली नाही व वातावरण पूर्णपणे काेरडे झाले आहे. अशात २४ तासात बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, ज्यामध्ये आर्द्रता निर्माण हाेत वाऱ्यासह मध्य भारताच्या दिशेने वाहत आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्रात द्राेणिका तयार झाली असून ती विदर्भ हाेत पूर्व दिशेने वाहत आहे. दाेन्हीच्या संयाेगाने पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर, गडचिराेलीसह दक्षिणेत वर्धा, यवतमाळ भागात २४ तासात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासह पुढचे तीन दिवस ढगाळ वातावरण कायम राहून काही ठिकाणी किरकाेळ पाऊस हाेण्याचीही शक्यता आहे. वेधशाळेने तीन दिवसाचा येलाे अलर्ट दिला आहे. जिर्ण, छप्पर असलेल्या घरातील नागरिकांनी सावध रहावे.
दरम्यान पावसासह वादळाचीही शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रति तास असू शकताे. त्यामुळे जिर्ण इमारती, छप्पर असलेल्या घरातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पहाटेच्या पावसाने गारवा
दरम्यान गेल्या काही दिवसात तापमान वाढत असल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे थाेडा दिलासा मिळाला. पहाटेच्या पावसाने वातावरणात गारवा भरला. त्यामुळे साेमवारी नागपुरात दिवसाचे कमाल तापमान १.६ अंशाने घसरून ३२.४ अंशावर आले. रात्रीच्या तापमानात मात्र वाढ नाेंदविण्यात आली. किमान तापमान १.२ अंशाने वाढून १८.४ अंशावर गेले, जे सरासरीपेक्षा २.१ अंशाने अधिक आहे. अकाेला व अमरावतीचे दिवसाचे तापमान मात्र ३७ अंशाच्या वर नाेंदविण्यात आले.
Web Summary : Vidarbha experienced rain and storms, bringing relief from the heat. Nagpur, Gondia, and Bhandara saw significant rainfall. A yellow alert is in place for the next three days due to potential adverse weather conditions in several districts.
Web Summary : विदर्भ में बारिश और तूफान से गर्मी से राहत मिली। नागपुर, गोंदिया और भंडारा में भारी वर्षा हुई। मौसम विभाग ने कई जिलों में अगले तीन दिनों के लिए येलो अलर्ट जारी किया है।