विदर्भात नागपूर नंबर वन

By Admin | Updated: November 19, 2016 02:39 IST2016-11-19T02:39:56+5:302016-11-19T02:39:56+5:30

गेल्या १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात प्रकरणे निकाली काढण्यामध्ये नागपूर जिल्ह्याने विदर्भातून पहिला क्रमांक पटकावला आहे.

Vidarbha Nagpur number one | विदर्भात नागपूर नंबर वन

विदर्भात नागपूर नंबर वन

लोकन्यायालय : ५,१११ प्रकरणे निकाली
नागपूर : गेल्या १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात प्रकरणे निकाली काढण्यामध्ये नागपूर जिल्ह्याने विदर्भातून पहिला क्रमांक पटकावला आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ५,१११ प्रकरणे निकाली निघाली आहेत. अनेक प्रकरणे आर्थिक तडजोडीशी संबंधित होती. त्यात एकूण ११ कोटी ६२ लाख ९५ हजार ३१९ रुपयांची तडजोड झाली. लोकन्यायालयासमक्ष एकूण ११ हजार ७२८ प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. ही सर्व प्रकरणे उच्च न्यायालयापेक्षा कनिष्ठ न्यायालयांतील आहेत. उच्च न्यायालयातील ३७ पैकी ६ प्रकरणे निकाली निघाली.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. सामंजस्याने वाद मिटविता येण्यासारखी असंख्य किरकोळ प्रकरणे दरवर्षी विविध न्यायालयांमध्ये दाखल होत असतात.
यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या सतत वाढत राहते. न्यायालयांचा अमूल्य वेळ अशा प्रकरणांवर खर्च होतो. परिणामी महत्त्वाची प्रकरणे वेळेवर निकाली काढता येत नाहीत. यावर उपाय म्हणून राज्यात वेळोवेळी लोकन्यायालये आयोजित करण्यात येतात.
त्यात तडजोडीयोग्य प्रकरणांचा आपसी सामंजस्याने निपटारा करण्यात येतो. अन्य जिल्ह्यांतील आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. प्राधिकरणाने वाशीम जिल्ह्याची आकडेवारी दिली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Vidarbha Nagpur number one