शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाच्या मुद्यावर वैदर्भीय आमदार गप्प

By admin | Updated: December 16, 2015 03:20 IST

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन करणाऱ्या पक्षाचे राज्यात शासन आहे.

मंत्रिपदाचा लोभ : शिवसेना अखंड महाराष्ट्रासाठी आक्रमककमल शर्मा नागपूरविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन करणाऱ्या पक्षाचे राज्यात शासन आहे. यामुळे विदर्भवासीयांच्या त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. पण विधानसभेत मंगळवारी जे काही झाले त्यातून वेगळेच संकेत मिळत आहेत. शासनात सहभागी शिवसेनेने अखंड महाराष्ट्राच्या समर्थनार्थ नारे दिले. महाधिवक्ता श्रीहरी अणे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. दुसऱ्या बाजूने ‘आॅन दि रेकॉर्ड’ व ‘आॅफ दि रेकॉर्ड’ विदर्भप्रेमाचा दावा करणारे आमदार मात्र शांत बसून राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर द्यावे लागले. सभागृहात ते एकटे पडले होते.हा प्रकार मंगळवारी दुपारी लक्षवेधी प्रस्तावावरील चर्चेनंतर घडला. महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या विदर्भावरील वक्तव्यावरून शिवसेना आमदार विधानसभेत आक्रमक झाले होते. आमदार प्रताप सरनाईक यांनी अणे यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव सादर करून राज्य शासनाला अडचणीत आणले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रस्ताव फेटाळला. यामुळे शिवसेना आमदारांनी वेलमध्ये गोळा होऊन निदर्शने केली. बागडे यांनी प्रस्ताव फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन करण्यास सांगितले. तेव्हाही शिवसेना सदस्यांची निदर्शने सुरूच होती. काही वेळाने ते शांत होऊन आपापल्या आसनावर बसले. यादरम्यान विदर्भातील एकाही आमदाराने तोंड उघडले नाही. कोठूनही जय विदर्भ असा आवाज निघाला नाही. हा उलटफेर आश्चर्यकारक होता. कारण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेना आमदार अखंड महाराष्ट्राचे नारे देत विधान भवनाच्या पायऱ्यांवर आले होते, तेव्हा विदर्भवादी आमदारांनी जय विदर्भाचे नारे लावून त्यांना उत्तर दिले होते. यामुळे आठ दिवसांमध्ये असे काय घडले ज्यामुळे विदर्भवादी आमदारांची तोंडे बंद झाली, हा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. आतली चर्चा अशी आहे की, मुख्यमंत्री फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. काय म्हटले शिवसेनेनेप्रताप सरनाईक यांनी प्रस्ताव सादर करताना सांगितले की, ‘विदर्भ गाथा’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी अणे यांनी महाराष्ट्र विरोधी वक्तव्य केले. महाधिवक्तापदावर कार्यरत असताना त्यांनी महाराष्ट्राच्या बाजूने बोलायला पाहिजे. यामुळे अणे यांनी विधानसभेत येऊन क्षमा मागावी, अन्यथा शासनाने त्यांना पदावरून काढून टाकावे. माजी महाधिवक्ता खंबाटा यांनाही क्षमा मागावी लागली होती.शासन माहिती घेत आहे- फडणवीसशासन श्रीहरी अणे यांच्या वक्तव्याची माहिती घेत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.