शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ-मराठवाडा राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे

By admin | Updated: June 5, 2017 02:09 IST

राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने यापूर्वी झारखंड, तसेच वाराणसी येथे कृषी विकास व दूध उत्पादनाचे चांगले काम केले असून ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत रामगिरीवर बैठक लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने यापूर्वी झारखंड, तसेच वाराणसी येथे कृषी विकास व दूध उत्पादनाचे चांगले काम केले असून त्याच धर्तीवर विदर्भ व मराठवाड्यात काम करून या भागाचा विकास साध्य करावा. शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेल्या ११ जिल्ह्यातील सुमारे तीन हजार गावात राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड दूध संकलन व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. अल्पावधीतच एनडीडीबी, मदर डेअरीने सुमारे ४० हजार लिटरपर्यंत दूध संकलन सुरू केले असून शेतकऱ्यांचाही चांगला सहभाग मिळत आहे. याच धर्तीवर विदर्भ व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये आपले कार्यक्षेत्र वाढवावे यासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.रामगिरी येथे विदर्भ व मराठवाड्यातील कृषी विकास, दूध उत्पादन, मत्स्य विकास, तसेच संत्र्यासह फलोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय संस्था, विविध विद्यापीठ तसेच राज्य शासनाच्या विविध विभागाचे समन्वयासाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला केंद्रीय भृपूष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे अध्यक्ष दिलीप राठ, व्यवस्थापकीय संचालक शिवा नागराजन, आ. सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, डॉ. आशिष देशमुख, मलिकार्जुन रेड्डी, सुधीर पारवे, प्रकाश गजभिये, तसेच केंद्र शासनांच्या विविध संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाच्या कापूस अनुसंधान केंद्र, निंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र, मृदा संशोधन विकास केंद्रासह पंजाबराव कृषी विद्यापीठ, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांचेकडील विविध योजना, प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासन समन्वयाने काम करून प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्याला प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.केंद्रीय भृपूष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडे असलेल्या पशुधन विकासाला प्रोत्साहन देण्यासोबतच दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी जास्त दूध देणाऱ्या देशातील गीर, साहिवाल, यासह प्रजातींचे सिमेन्सचा वापर करून दूध उत्पादन वाढविण्यासाठीचा उपक्रम राबवितांनाच मदर डेअरी व एनडीडीबी यांनी विदर्भातील प्रत्येक गावांमध्ये दूध उत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेल्या पशुखाद्य व चाऱ्याच्या प्रजातीच्या विकासाला प्रोत्साहन देण्याबाबत सहकार्य करावे, अशी सूचना केली. केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्र, तसेच निंबूवर्गीय फळसंशोधन केंद्रामधून शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनासोबतच समन्वय करून शेतकऱ्यांना संशोधित वाण उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना केली. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी विदर्भ व मराठवाड्यातील शेती विकासाला आवश्यक असणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे, असेही यावेळी सांगितले. केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्र, तसेच निंबूवर्गीय फळसंशोधन केंद्रातील अधिकाऱ्यांनी विदर्भ व मराठवाडा येथील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन शेतात प्रत्यक्ष कोणती मदत लागते याची माहिती घेत त्याच ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे. विदर्भात रेशीम उत्पादन वाढीसाठी आवश्यक संशोधन करून शेतकऱ्यांच्या शेतीशाळा आयोजित कराव्यात, असे ते म्हणाले.