शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीपूर्वी विदर्भ द्या

By admin | Updated: July 4, 2014 01:19 IST

राज्य विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य द्या, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.

विदर्भवाद्यांचे आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदननागपूर : राज्य विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य द्या, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.समितीतर्फे मंगळवारी विदर्भातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले. नागपुरातही समितीचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांना भेटले व त्यांना निवेदन सोपविले. यावेळी समितीचे पदाधिकारी डॉ. श्रीनिवास खांदेवाले, विक्रम बोके, प्रवीरकुमार चक्रवर्ती, दीपक निलावार, राम नेवले, अ‍ॅड. नंदा पराते, प्रवीण महाजन, दिलीप नरबडिया, जे.पी. शर्मा, बलबीरसिंग रेणू, अविनाश पटवर्धन, अरुण केदार, अण्णाजी रजेधर, गणेश शर्मा, घनश्याम पुरोहित, शेरखाँ पठाण, भीमराव फुसे, डॉ. प्रभाकर बोरकर, वसंतराव कांबळे, एम.जे. शेख, लक्ष्मण पोटे, महेश दुरुगकर, प्रदीप अंमलवार, अश्विन तिवारी, विनीत पराते, आनंदराव लिखार उपस्थित होते. विदर्भातील नागरिकांची स्वतंत्र राज्याची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. तेलंगण राज्य निर्मितीनंतर वैदर्भीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जनभावनेचा सन्मान करून विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी स्वतंत्र राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांविरोधात घोषणाशिष्टमंडळातील सदस्यांच्या संख्येवरून समितीचे प्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्यात वाद झाला. शिष्टमंडळात एकूण ३५ सदस्य होते. इतक्या जम्बो शिष्टमंडळाला कक्षात बोलवण्यास जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी नकार दिला. पाच जणांचे शिष्टमंडळ पाठवा, अशी सूचना त्यांनी केली. मात्र समितीचे सदस्य त्याला राजी नव्हते. आम्ही सर्वच भेटू, यावर समितीचे सदस्य आग्रही होते. या मुद्यावरून जिल्हाधिकारी आणि समितीचे सदस्य यांच्यात शाब्दिक वादही झाला. निवृत पोलीस महानिरीक्षक प्रवीरकुमार चक्रवर्ती व प्रवीण बोके (आयपीएस) यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. अखेर कृष्णा यांनी जम्बो शिष्टमंडळास भेटण्याची तयारी दाखविली. मात्र या एकूणच प्रकरणाचा विदर्भ राज्य आंदोलन समितीने निषेध करून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणा दिल्या.