शहरं
Join us  
Trending Stories
1
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
2
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
3
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
4
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
5
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
6
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
7
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
8
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
9
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
10
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
11
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
12
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
13
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
14
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
15
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
16
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
17
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
18
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
19
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
20
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
Daily Top 2Weekly Top 5

रिच-४ मध्ये व्हायाडक्ट, स्टेशनचे ९० टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:09 IST

- ८.३० किमी मार्गावर नऊ स्टेशन नागपूर : महामेट्रोच्या सीताबर्डी ते प्रजापतीनगर कॉरिडोरचे कार्य वेगात सुरू असून, रिच-४ या ...

- ८.३० किमी मार्गावर नऊ स्टेशन

नागपूर : महामेट्रोच्या सीताबर्डी ते प्रजापतीनगर कॉरिडोरचे कार्य वेगात सुरू असून, रिच-४ या मार्गावर रूळ बसविण्यात येत आहेत. या मार्गावर व्हायडक्ट व स्टेशनचे कार्य ९० टक्के पूर्ण झाले आहे.

एकूण ८.३० किमीच्या या मार्गावर कॉटन मार्केट, नागपूर रेल्वे स्टेशन, दोसर वैश्य चौक, अग्रसेन चौक, चितार ओळ, टेलिफोन एक्स्चेंज चौक, आंबेडकर चौक, वैष्णोदेवी चौक, प्रजापतीनगर असे नऊ स्टेशन आहेत. मुख्य म्हणजे या मार्गावर देशातील २३१.२ मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आनंद टॉकीज, सीताबर्डी ते कॉटन मार्केटपर्यंत सुरू आहे. भारतीय रेल्वेच्या ट्रॅकवरून १०० मीटरचा एक स्पॅन (३ मीटरचा एक गर्डर) या रेल्वे ट्रॅकवरून राहणार आहे.

नागपूरच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा सेंट्रल एव्हेन्यू हा एक प्रमुख मार्ग आहे. सेंट्रल एव्हेन्यू परिसर व्यावसायिक स्वरूपाचा असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात आवागमन होते. वाहतुकीच्या गर्दीमुळे प्रकल्प राबविताना मेट्रोने पुरेपूर काळजी घेतली. या मार्गावर प्रवासी सेवा सुरू झाल्यास मेयो हॉस्पिटल, रेल्वेस्थानक, कॉटन मार्केट, इतवारी बाजारपेठ इत्यादी ठिकाणी जाणे सोयीस्कर ठरेल.

या मार्गावर झालेल्या कार्याची आकडेवारी :

पाइल्स १२८४ पैकी १२८४, पाईल कॅप २५० पैकी २५०, पियर २६६ पैकी २६२, पियर कॅप २६५ पैकी २६२, पियर आर्म ४५ पैकी ४५, ट्रॅक आर्म ४४ पैकी ४४, सेग्मेंट कास्टिंग २३९३ पैकी २३९३, स्पॅन इरेक्शन २४९ पैकी २३०, क्रॅश बॅरियर फिक्सिंग २५० पैकी २४३ पूर्ण.