वर्धा मार्गावर ‘डबलडेकर’वर हेलकावे खाताहेत वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 08:34 PM2020-11-18T20:34:24+5:302020-11-18T20:38:15+5:30

Road safty Nagpur News वर्धा रोडवरील ३.१५ किमी लांबीच्या डबलडेकर पुलावरून जाणाऱ्या वाहनातील प्रवाशांना हेलकावे खात असल्याचा अनुभव येत आहे.

Vehicles are swinging on 'Doubledecker' on Wardha road | वर्धा मार्गावर ‘डबलडेकर’वर हेलकावे खाताहेत वाहन

वर्धा मार्गावर ‘डबलडेकर’वर हेलकावे खाताहेत वाहन

Next
ठळक मुद्देपूल बनण्यास उशीरबांधकामात आहेत त्रुटी

वसीम कुरैशी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वर्धा रोडवरील ३.१५ किमी लांबीच्या डबलडेकर पुलावरून जाणाऱ्या वाहनातील प्रवाशांना हेलकावे खात असल्याचा अनुभव येत आहे. पुलाच्या बांधकामाला मर्यादेपेक्षा जास्त वेळ लागल्यानंतरही रस्ता सदोष बनला आहे. विलंबानंतर तयार झालेल्या पुलावरून जाणाऱ्या वाहनचालकांना सिग्नलपासून दिलासा मिळण्याच्या सुविधेसह आरामदायक प्रवास करता येईल, असे वाटत होते, पण पुलाच्या रचनेवरून असे वाटत नाही.

पुलाच्या सेगमेंटवर कॉन्क्रिटीकरण केल्यानंतर वरील भागात डांबराचा थर टाकण्यात आला आहे. डांबरमिश्रित गिट्टीपासून बनलेला रस्ता कॉन्क्रिट रस्त्याच्या तुलनेत जास्त आरामदायक असतो. परंतु वर्धा रोडवरील डबलडेकर पुलावरून वाहन चालविताना प्रवाशाला असा अनुभव येत नाही. अखेर याचे कारण काय, यासंदर्भात माहिती प्राप्त झाली आहे. एकाच ठिकाणी डबलडेकर पुलासह आरओबी व आरयूबी प्रकल्प असल्याने कामात उशीर झाला. प्रारंभी भूसंपादनाची मोठी समस्या राहिली. आरओबी व आरयूबीसोबतच बांधकाम पूर्ण करण्यासाठी डबलडेकर पुलाच्या कामात उशीर झाला. त्यानंतर अचानक पूल सुरू करण्यासाठी दबाव वाढू लागला. अशातच काही कारणांनी पुलाचा रस्ता समतोल बनला नाही.

अशी असू शकतात कारणे :

- सेगमेंटवरील भागात टाकण्यात आलेले कॉन्क्रिट अनेक ठिकाणी समतोल नाही.

- गिट्टीचा आकार अनेक ठिकाणी बदलण्यात आला.

- गिट्टीच्या आकारात अंतर असल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी १ ते ३ इंचीचा उंचवटा आला.

- डांबरी रस्ता पक्का होण्यासाठी वेळ लागतो. परंतु आरओबीच्या बांधकामासाठी लोकार्पणापूर्वी कंत्राटदार वाहनांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे रस्त्याच्या थरावर परिणाम झाला.

उपयोगासह रस्त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत होणार

डबलडेकर पुलाचा रस्ता मेस्टिकचा बनला आहे. यामध्ये डांबर, कोळसा, फायबर व गिट्टीचे मिश्रण असते. सध्या वरील थर किंचित ओबडथोबड आहे. या रस्त्यावरून वाहन वेगाने गेल्यास घसरणार नाही, याकरिता थर असा ठेवण्यात आला आहे. निरंतर उपयोगानंतर मेस्टिक मटेरियल सपाट होईल आणि रस्त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत होईल.

अखिलेश हळवे, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो.

Web Title: Vehicles are swinging on 'Doubledecker' on Wardha road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.