शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त जागा भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:57 IST

नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागासोबतच आता वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदांपैकी ५० टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे, अशी ...

नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागासोबतच आता वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदांपैकी ५० टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य, कुटुंबकल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ‘लोकमत’ला दिली. शनिवारी मेयो, मेडिकलचा आढावा घेण्यासाठी ते नागपुरात आले असताना बोलत होते.

यड्रावकर यांनी सकाळी १०.३० वाजता मेडिकलच्या अधिष्ठाता कक्षात सर्व वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा केली. मेडिलकचा आढावा घेत उपाययोजनांबाबत काही सूचनाही केल्या. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, प्रभारी अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंग, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मेडिकलमधील फायर ऑडिट आणि संबंधित रुग्णालयातील सुरक्षात्मक उपाययोजना, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत माहिती घेतली. आईकडून नवजात बाळांना झालेला कोविडचा संसर्ग, कोविड रुग्णांसाठीच्या व्यवस्थेची यावेळी त्यांनी माहिती घेतली.

- फायर व विद्युत ऑडिटसाठी निधी देणार

भंडारा अग्निकांड भविष्यात इतर रुग्णालयात होऊ नये यासाठी सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर व विद्युत ऑडिट करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी लागणारा निधी दिला जाईल. तशी तरतूदही करण्यात आल्याचे यड्रावकर म्हणाले.

- मेडिकलचा कॅन्सर हॉस्पिटल प्रश्न निकाली काढू

मेडिकलमध्ये कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीसाठी २०१२ पासून प्रयत्न सुरू आहेत. एका जनहित याचिकेवर, जून २०१७ मध्ये दोन वर्षांत कॅन्सर हॉस्पिटल उभारावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. इमारतीच्या बांधकामासाठी ७६ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांना प्रशासकीय मंजुरीही देण्यात आली आहे. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रकल्प रखडत चालला आहे. याबाबत बोलताना यड्रावकर म्हणाले, कॅन्सर हॉस्पिटलचा प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे. याचा फायदा गरीब रुग्णांना होईल.

- सिकलसेल नमुन्याच्या तपासणीसाठी नागपुरात प्रयोगशाळा

सिकलसेलचे नमुने तपासणीसाठी मुंबई आणि हैदराबाद येथील प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात येत होते. त्यामुळे अहवाल येण्याची प्रतीक्षा करावी लागत असे. सिकलसेलच्या रुग्णांसाठी आता नागपुरातच नमुना तपासणी प्रयोगशाळा सुरू होणार आहे, असेही यड्रावकर यांनी सांगितले.