शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

उस्ताद अमीर खाँच्या आठवणीत रंगलेले रागसंगीत

By admin | Updated: February 19, 2015 02:08 IST

शास्त्रीय संगीतात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळ्यावेगळ्या आलापीप्रधान गायकीने श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारे मरहूम अमीर खाँ साहेब यांच्या ...

नागपूर : शास्त्रीय संगीतात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळ्यावेगळ्या आलापीप्रधान गायकीने श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारे मरहूम अमीर खाँ साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित संगीत सभेत ज्येष्ठ गायक आणि उस्ताद अमीर खाँ साहेबांचे मार्गदर्शन लाभलेले डॉ. बाळासाहेब पुरोहित व प्रभाकरराव काळे तसेच डॉ. पुरोहित यांचे शिष्य विनोद वखरे यांनी रागसंगीताच्या मैफिलीतून खाँ साहेबांना भावपूर्ण स्वरांजली अर्पण केली. हा कार्यक्रम वसंतनगर येथे आयोजित करण्यात आला. संगीत सभेचा प्रारंभ ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण जोशी तसेच भय्यासाहेब हारोडे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी विनोद वखरे यांनी राग यमनमध्ये विलंबित एकतालात ‘कहो सखी कैसे’ आणि द्रुत त्रितालात निबद्ध बंदिश तसेच तराणा सादर केला. पत्रकारितेच्या क्षेत्रात मोलाचा जीवनगौरव सन्मान प्राप्त झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार जोशी यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर प्रभाकर काळे यांनी राग सरस्वतीने उपस्थितांना जिंकले. विलंबित एकतालात आणि द्रुत त्रितालात त्यांनी सादरीकरण केले. भजन सादर करून त्यांनी गायनाचा समारोप केला. मोजके आणि रसाळ गायन ही त्यांची जमेची बाजू होती. त्यांना संवादिनीवर श्याम ओझा तर तबल्यावर राम ढोक व नीलेश खोडे यांनी साथ दिली. मैफिलीचा समारोप बाळासाहेब पुरोहित यांनी दरबारी, शहाणा कानडा, जोग व मालकंस या रागातील विविध बंदिशींनी केला. मध्यसप्तकातील षड्जाला साद घालणारे पुरोहित यांचे गायन म्हणजे युवा गायकांसाठी पर्वणीच होती. खाँ साहेबांच्या स्मृतींची आठवण करणारे तसेच वेगवेगळ्या त्रिताल, झपताल, रूपक, एकतालात निबद्ध बंदिशी त्यांनी रसाळतेने सादर केल्या. ‘न्पगवा गुरु के लगना’ या मालकंसमधील बंदिशीने त्यांनी खाँ साहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे निवेदन साधना शिलेदार यांनी केले. याप्रसंगी सुभाष कशाळकर, भय्यासाहेब हारोडे, सुजाता व्यास, शंकर भट्टाचार्य, पत्तरकिने, मीना राव यांच्यासह अनेक ज्येष्ठ कलावंत उपस्थित होते. ध्वनिसंयोजन मल्हार क्रिएशन्स यांचे होते. (प्रतिनिधी)