शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या प्रतिकृती शेतीकरिता उपयुक्त

By admin | Updated: January 3, 2016 03:40 IST

तंत्रज्ञानाच्या माध्यमाने विज्ञानाची सांगड घालून विद्यार्थ्यांनी साकारलेल्या प्रतिकृती शेतीकरिता उपयुक्त ठरत आहेत. विद्यार्थ्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या ...

कामठी : तंत्रज्ञानाच्या माध्यमाने विज्ञानाची सांगड घालून विद्यार्थ्यांनी साकारलेल्या प्रतिकृती शेतीकरिता उपयुक्त ठरत आहेत. विद्यार्थ्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या मॉडेल्सचा शेतकऱ्यांना लाभ होईल. नैसर्गिक पाणी व इतरही नवनवीन शेतीपयोगी प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार कराव्यात, असे आवाहन स्थानिक नगर परिषदेचे उपाध्यक्ष रणजित सफेलकर यांनी केले. स्थानिक सरस्वती उच्च प्राथमिक शाळेत आयोजित विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रारंभी दीपप्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार देवराव रडके, शेषमल ओसवाल, माजी नगराध्यक्ष नीरज यादव, शरद कोरेमोरे, नगरसेवक प्रमोद कातोरे, शिक्षण अधिकारी देवगडे, पांडुरंग बागरे, डॉ. विजय रडके, तुषार रडके, श्यामलाल शर्मा, मुख्याध्यापिका रमा नेहारे आदी उपस्थित होते.विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध ८० प्रतिकृती सादर केल्या. प्रदर्शनात सादर केलेल्या प्रतिकृतीबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी शेतीपयोगी व नैसर्गिक पाणी उपलब्ध होईल, अशा प्रतिकृती निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांसाठी सोयीचे होईल. त्यामुळे शेतकरी प्रगत शेती करण्याकडे वळतील, असाही सूर मान्यवरांनी प्रदर्शनाच्या पाहणीदरम्यान व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुषमा राखडे यांनी केले. संचालन विजया गोतमारे यांनी तर यादव ढवळे यांनी आभार मानले. विज्ञान प्रदर्शनाकरिता शंकर भुजाडे, समुद्रे, वसंत खुरगे, शंकर पारधी, जयपाल बारसागडे, यादव पाठे, रंजना ठवकर, निर्मला चौधरी, कृष्णा बोडतकर, हारगुडे, कोठारी, कल्पना फुलझेले, मेकलवार, जांगडे, लाभाडे, शिल्पा मस्के, शीतल भोंडे आदींसह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)