शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
3
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
4
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
5
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
6
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
7
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
8
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
9
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
10
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
12
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
13
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
14
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
15
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
16
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
17
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
18
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच केजरीवाल यांना अटक का? सर्वोच्च न्यायालयाची ईडीला विचारणा; म्हणाले...
20
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 

असंघटित कामगारांनी श्रमयोगी मानधन आणि निवृत्ती वेतन योजनांचा लाभ घ्यावा : श्रीकांत फडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:13 PM

३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०१९ या कालावधीत प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, तेव्हा असंघटित क्षेत्रातील कामगारांनी या योजनांचा लाभ घ्यावा

ठळक मुद्देशनिवारपासून विशेष सप्ताह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्व असंघटित कामगार, बांधकाम कामगार, अंगणवाडी सेविका, बचतगट सदस्य, घरगुती कामगार, फेरीवाले, रिक्षाचालक, वीटभट्टी कामगार, शेतमजूर, मनरेगा कामगार, मच्छिमार कामगार आणि इतर कामगार संघटना इत्यादी क्षेत्रातून कार्यरत कामगारांसाठी कामगार कल्याण विभागाच्यावतीने ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०१९ या कालावधीत प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, तेव्हा असंघटित क्षेत्रातील कामगारांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेद्वारे केले.या योजनेंतर्गत ६० वर्षे वयानंतर ३ हजार रुपये प्रति महिना किमान निवृत्ती वेतन देण्यात येणार असल्याचे श्रीकांत फडके यांनी सांगितले. वर्गणीदार मृत झाल्यास त्याच्या कुटुंबाला पेन्शन लागू होईल. कोणत्याही वेळेस पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी सदस्यांसाठी १८ वर्षे वयापर्यंत रुपये ५५ तर ४० वर्षे वयापर्यंत २०० रुपये दरमहा वयोमानानुसार अंशदान निर्धारित करण्यात आले आहे. लिंक खात्यातून पहिल्या हप्त्यानंतर ऑटो डेबिट सुविधा देण्यात येणार असून यासाठी केंद्र सरकारकडून मासिक अंशदान मिळणार आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील संस्था व एलआयसीद्वारे व्यवस्थापित निधी व्याजासकट परत मिळणार आहे. या शिबिराचे आयोजन महानगरपालिकेच्या दहा झोन कार्यालयात ३० नोव्हेंबर रोजी, उमरेड, काटोल, कळमेश्वर नगरपालिकामध्ये ३ डिसेंबर रोजी, सावनेर, रामटेक, कामठी नगरपालिका ४ डिसेंबर तर उमरेड, बुटीबोरी, कन्हान, पिपरी, वाडी नगरपालिका येथे ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत करण्यात आले आहे.नोंदणी करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र उपलब्ध असून याची नोंदणी या सप्ताहानंतरही सुरू राहील. नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी असून नोंदणी करण्यासाठी पात्र कामगारांजवळ आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत तसेच भ्रमणध्वनी क्रमांक असणे आवश्यक आहे.यावेळी केंद्रीय कामगार कल्याण आयुक्त पी. गणेशन, अपर कामगार आयुक्त विजयकांत पानबुडे, सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे तसेच बाल कल्याण विभागाचे समन्वयक दिनेश ठाकरे उपस्थित होते.

टॅग्स :Labourकामगारnagpurनागपूर