यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 06:06 IST2025-12-08T06:06:41+5:302025-12-08T06:06:41+5:30

व्हीआयपींना देण्यात येणाऱ्या पासेस वेगवेगळ्या रंगाचे देण्यात येत आहेत. त्यांच्या प्रवेशाचे गेटही वेगळे राहतील. यासोबतच विना पास व्यक्तीने प्रवेश केला असेल, तर त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Unnecessary crowd will be avoided this year, winter session starts today, administration is ready: Speaker, Deputy Speaker take review | यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा

यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा

नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात (विधान भवनात) होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यात येणार आहे. याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.

प्रा. राम शिंदे यांनी सांगितले, हिवाळी अधिवेशनाबाबतच्या तयारीचा सकाळी आढावा घेण्यात आला. त्यावेळी अनावश्यक गर्दी टाळण्याबाबतचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

व्हीआयपींना देण्यात येणाऱ्या पासेस वेगवेगळ्या रंगाचे देण्यात येत आहेत. त्यांच्या प्रवेशाचे गेटही वेगळे राहतील. यासोबतच विना पास व्यक्तीने प्रवेश केला असेल, तर त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विधान भवनाच्या मंत्री परिषद सभागृहात प्रा. शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हिवाळी अधिवेशनासाठी स्थानिक प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.

या बैठकीला विधान मंडळाचे सचिव जितेंद्र भोळे (सचिव १), मेघना तळेकर (सचिव-२), डॉ. विलास आठवले                            (सचिव-३) आणि शिवदर्शन साठ्ये (सचिव-४) यांच्यासह विधानमंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्थानिक प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी उपस्थित होते. बैठकीनंतर सभापती व उपसभापती यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची व परिसरातील व्यवस्थेची पाहणी केली.

इंटरनेट-वायफाय सुविधा, सुरक्षेची जाणून घेतली माहिती

अधिवेशन कालावधीमध्ये मंत्री, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य व अन्य मान्यवरांसाठी करण्यात आलेली निवास व्यवस्था, पुरविण्यात आलेली इंटरनेट-वायफाय सुविधा, सुरक्षा, आरोग्य आदी सुविधांबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. रविभवन आणि नागभवन येथील कुटीरमध्ये देण्यात आलेल्या वायफाय व इंटरनेट व्यवस्थेबाबत माहिती घेण्यात आली. महिला आमदारांची निवास व्यवस्था, राजकीय पक्षांच्या प्रतोदांना कार्यालये उपलब्ध करून देणे आणि या सर्व ठिकाणी सुरळीत वीज पुरवठा, लिफ्ट, अग्निशमन व्यवस्था, स्वच्छता आदींविषयी निर्देशही देण्यात आले.

विमानांची गैरसोय, नोडल अधिकारी नियुक्त

सध्या विमानांची गैरसोय आहे. अधिवेशनासाठी कोणत्याही सदस्यांना उशीर होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये, ते वेळेवर पोहोचावेत यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

यासोबतच परत जातानासुद्धा १४ तारखेला रात्री आणि १५ तारखेला विशेष रेल्वेची व्यवस्था करण्याची सूचना रेल्वे विभागाला करण्यात आली होती. ती रेल्वेने मान्य केल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title : शीतकालीन सत्र की तैयारी: भीड़ नियंत्रण, सुरक्षा, सुविधा समीक्षा

Web Summary : शीतकालीन सत्र में भीड़ नियंत्रण प्राथमिकता है। अधिकारियों ने सुविधाओं, सुरक्षा की समीक्षा की और यात्रा मुद्दों को संबोधित किया। वीआईपी पास और समर्पित गेट पहुंच का प्रबंधन करेंगे। उड़ान व्यवधानों में सहायता के लिए एक नोडल अधिकारी नियुक्त और विशेष ट्रेनों की व्यवस्था है।

Web Title : Winter Session Gears Up: Crowd Control, Security, and Facility Review

Web Summary : The winter session prioritizes crowd control. Officials reviewed facilities, security, and addressed travel issues. VIP passes and dedicated gates will manage access. A nodal officer is appointed to assist with flight disruptions and special trains are arranged.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.