विद्यापीठाची ‘हि रो गि री’

By Admin | Updated: June 2, 2015 02:09 IST2015-06-02T02:09:16+5:302015-06-02T02:09:16+5:30

ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने नागपूर विद्यापीठ सुरू आहे, त्यांच्याच अध्यासनाचा अभ्यासक्रम अद्याप सुरू

The University's 'Hei Ro Ghi' | विद्यापीठाची ‘हि रो गि री’

विद्यापीठाची ‘हि रो गि री’

नागपूर : ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने नागपूर विद्यापीठ सुरू आहे, त्यांच्याच अध्यासनाचा अभ्यासक्रम अद्याप सुरू झालेला नाही. ‘बुद्धिस्ट स्टडी सेंटर’च्या इमारतीची कोनशिला सात वर्षांनंतर झाली. ज्या गोष्टी सुरू आहेत, त्यांना प्रशासन योग्य न्याय देऊ शकत नसताना केवळ एका कंपनीसाठी ‘सुपरवायझर’ तयार करणारा ‘रोबोटिक्स’चा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु यासाठी सोमवारी झालेल्या पाहणी दौऱ्यादरम्यान, चर्चा कमी अन् अभिनेता विवेक ओबेरॉय याची ‘आवभगत’च जास्त दिसून आली. त्याचे प्रशासनाकडून अक्षरश: ‘रेड कार्पेट’ स्वागत करण्यात आले.

‘विवेक वन स्नॅप प्लीज’
नागपूर विद्यापीठात हे केंद्र आले तर ती नक्कीच गौरवाची बाब ठरणार आहे. परंतु विद्यापीठात याअगोदरदेखील अनेक नवीन अभ्यासक्रम आले, परंतु प्रत्यक्षात अंमलबाजवणी फार संथपणे झाली. सोमवारी प्रत्यक्षात अनेक सदस्यांना चर्चेऐवजी विवेक ओबेरॉयसोबत छायाचित्र काढून घेण्यातच जास्त रस दिसला. यात विद्यापीठाचे अधिकारीदेखील समाविष्ट होते. विद्यापीठातर्फे सामंजस्य कराराचा मसुदा तयार करण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात त्यावर स्वाक्षऱ्या कधी होणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

Web Title: The University's 'Hei Ro Ghi'