शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांमधील ‘संशोधक’ शोधणार विद्यापीठ

By admin | Updated: February 1, 2015 00:54 IST

यंदाच्या इंडियन सायन्स कॉंग्रेसमध्ये प्रथमच सहभागी होत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एक नवीन सुरुवात केली आहे. यानंतर विद्यापीठाकडून आणखी दमदार प्रतिनिधित्व व्हावे

‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’पासून प्रेरणा : विभागांकडून मागविणार संशोधनाची माहितीनागपूर : यंदाच्या इंडियन सायन्स कॉंग्रेसमध्ये प्रथमच सहभागी होत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एक नवीन सुरुवात केली आहे. यानंतर विद्यापीठाकडून आणखी दमदार प्रतिनिधित्व व्हावे याकरिता प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यानुसार विद्यापीठ स्तरावर संशोधन स्पर्धा आयोजित करून यातील निवडक व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन प्रकल्प व ‘मॉडेल’ ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’ला पाठविण्यात येण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रथमच सहभागी होत असताना मिळालेल्या प्रतिसादामुळे विद्यापीठात उत्साह संचारला असल्याची भावना प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे यांनी व्यक्त केली.जानेवारी महिन्यात मुंबई येथे घेण्यात आलेल्या ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’मध्ये विद्यापीठाच्या सहभागाबाबत व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्यापीठातील अधिकारी व सहभागी झालेले प्राध्यापक-विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शनिवारी दीक्षांत सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘इंडियन सायन्स काँग्रेस’मध्ये प्रयोग सादर करणारे नागपूर विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ होते. विद्यापीठाकडून अगदी वेळेवर याची तयारी करण्यात आली होती. तरीदेखील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन प्रकल्प सादर करण्यात विद्यापीठाला यश आले आहे. सात पोस्टर व सहा लाईव्ह मॉडेलचे सादरीकरण करण्यात आले होते. देशभरातील विविध तज्ज्ञ, संशोधक, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या प्रयोगांचे कौतुक केले होते. विद्यापीठासाठी ही भूषणावह बाब असल्याचे मत डॉ.देशपांडे यांनी व्यक्त केले. विद्यापीठाकडून या ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’ला डॉ.अनिल हिरेखन, गणेश कुंकुमवार, डॉ.सुधार बन्सोड यांनी सहभागी प्रतिनिधींना मोलाचे सहकार्य केले.(प्रतिनिधी)नागपुरात आयोजनाचा प्रयत्न‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’चे वेळापत्रक तीन वर्ष अगोदरपासून ठरले असते. त्यामुळे तीन वर्षांनंतर नागपूर विद्यापीठात याचे आयोजन करण्यासंदर्भात प्रशासनाकडून पूर्ण प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध संशोधन प्रकल्पांचे रमण विज्ञान केंद्र येथे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.