शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

विषयनिहाय शुल्काचा विद्यापीठाला पडला विसर

By admin | Updated: February 11, 2016 03:27 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पुरवणी परीक्षेसाठी सरसकट परीक्षा शुल्क न घेता विषयनिहाय शुल्क घेण्याचा निर्णय घेतला होता.

अद्यापही अधिसूचना नाही : विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा आर्थिक फायदा महत्त्वाचा?योगेश पांडे  नागपूरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पुरवणी परीक्षेसाठी सरसकट परीक्षा शुल्क न घेता विषयनिहाय शुल्क घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. हिवाळी परीक्षांचे निकाल जाहीर होत असताना विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. ‘पीएचडी’ शुल्काची अव्वाच्या सव्वा वाढ तत्काळ लागू करणाऱ्या प्रशासनाला विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी ही तत्परता का आठवत नाही, असा संतप्त सवाल व्यक्त करण्यात येत आहे.विद्यापीठात एक किंवा दोन विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण परीक्षेचे शुल्क भरावे लागते. या प्रकाराने विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसतो. इतर विद्यापीठांच्या तुलनेत नागपूर विद्यापीठाचे परीक्षा शुल्क अधिक असल्याची विद्यार्थी संघटना व प्राधिकरण सदस्यांकडून ओरड होते. या मुद्यावरून विद्यार्थी संघटनांनी अनेकदा विद्यापीठात आंदोलनेदेखील केली. विषयनिहाय शुल्क आकारण्याचा प्रस्ताव विद्वत परिषदेत मांडण्यात आला होता. शुल्क आकारणी कशी करावी, यासाठी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली. यात व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. के.सी. देशमुख, अधिष्ठाता डॉ. रवींद्र क्षीरसागर, डॉ. शरयू तायवाडे, वित्त अधिकारी आणि परीक्षा नियंत्रकाचा समावेश करण्यात आला. या समितीने सादर केलेल्या अहवालाला कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी मान्यता दिली होती व लवकरच याची अधिसूचना जाहीर होईल, याची घोषणा केली होती.परंतु प्रत्यक्षात मात्र अडीच महिने उलटून गेल्यावर यासंदर्भातील अधिसूचना जाहीर करण्यात आलेली नाही. यासंदर्भात कुलगुरूंना विचारणा करण्यात आली असता काही तांत्रिक कारणांमुळे याला विलंब झाला असल्याचे त्यांनी मान्य केले. परंतु विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता याची अधिसूचना तत्काळ प्रभावाने जारी करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.